शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

चांगल्या आरोग्यसेवेसाठी सुसंवाद महत्त्वाचा : विपीन चेकर; पुण्यात हेल्थकेअर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:31 IST

चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपीन चेकर यांनी केले.

ठळक मुद्देलेवा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (एलसीसीआयए)तर्फे ‘हेल्थकेअर’ परिषदपोलिसांच्या फोननंतर न घाबरता धैर्याने सामोरे जावे : विपीन चेकर

पुणे : चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रुग्णाचे दस्तावेज आणि सर्व आवश्यक कागदपत्राच्या नोंदी असतील, तर पोलिसांपासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते आणि तुम्ही अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरवू शकता’, असे प्रतिपादन मुंबई येथील सामाजिक व पोलीस कार्यकर्ते आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपीन चेकर यांनी केले.लेवा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (एलसीसीआयए) तर्फे आयोजित ‘हेल्थकेअर’वरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘पोलिसांच्या फोननंतर पुढे काय?’ या विषयावर चेकर बोलत होते. यावेळी डॉ. विश्वनाथ कोल्हे डॉ. सुभाष चौधरी, डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रवींद्र चौधरी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, वासू पाटील, गौरव अतरदे, प्रशांत चौधरी, डॉ. पवन भोळे, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. संदीप भिरूड, सचिव डॉ. राहुल चौधरी, सहसचिव डॉ. विवेक नेमाडे, कोषाध्यक्ष डॉ. भूषण जावळे, सहकोषाध्यक्ष  स्वप्नील भोळे, आयोजन प्रमुख डॉ. रत्नप्रभा चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या परिषदेमध्ये हेल्थकेअर, मेडिको लीगल, मार्केटिंग इन हेल्थकेअर, आरोग्यसेवेत आयटीची भूमिका आदी विषयांवर परिसंवाद झाले. यावेळी डॉ. विश्वनाथ कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सुभाष चौधरी यांना हेल्थकेअर आयकॉन आणि डॉ. उल्हास पाटील यांना व्हर्सटाईल पर्सोनॅलिटी आॅफ हेल्थकेअर प्रदान करण्यात आला.चेकर म्हणाले, ‘एखाद्या प्रकरणात पोलिसांचा फोन आल्यास आपण घाबरून जातो. मात्र, आपला स्थानिक पोलिसांशी चांगले संबंध असतील आणि कागदपत्रे व्यवस्थित असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. वकिलामार्फत जामीन मिळवण्याचा प्रयत्न करावा. कठिण प्रसंग उद्भवल्यास कुटुंबीयांना माहिती असावी. पोलिसांच्या फोननंतर न घाबरता धैर्याने सामोरे जावे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावेत. सुरक्षेची काळजी घ्यावी.’डॉ. सुरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रत्नप्रभा चौधरी, पूनम यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेंद्र ठोंबरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे