शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे पॉलिशच्या बहाण्याने साडेपाच तोळे दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:46 IST

पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देहा फसवणुकीचा प्रकार मंगळवारी (दि, ६) सकाळी अकराच्या सुमारास घडला. विश्वास रंगनाथ देवकाते (रा. मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदवतीस  हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना  उघडकीस आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार  मंगळवारी (दि, ६) सकाळी अकराच्या सुमारास घडला. सराफ दुकानात मजुरी जादा लागते आणि आम्ही आपल्या नजरे समोरच दागिने नवे करुन देतो असे सांगून  दागिन्यांची चोरी केली आहे. समाजात अशाच प्रकारे अनेक ठिकाणी महिलांची फसवणूक करण्यात येत असूनही महिला सावधानता बाळगत नसल्याचे  अशा घटनांमधून निदर्शनास येत आहे.       याबाबत विश्वास रंगनाथ देवकाते (रा. मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सकाळी अकराच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी घरी येवून घरातील महिलांना सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून बोरमाळ, गंठन, दोन फुले, सोन्याची अंगठी, आणि मंगळसुत्राच्या दोन वाट्या असे एकूण दागिन्यांची चोरी केली. देवकाते यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात  चोरट्यांच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भिगवणचे पोलीस उपनिरीक्षक बी. एन पवार, पोलीस शिपाई सी. सी भागवत करत आहे.

टॅग्स :PuneपुणेThiefचोरIndapurइंदापूरGoldसोनं