सोन्याची नथ अन् चांदीचा छल्ला!
By Admin | Updated: February 15, 2016 01:30 IST2016-02-15T01:30:06+5:302016-02-15T01:30:06+5:30
मकरसंक्रातीला महिला घरोघरी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. त्यात सौभाग्याचे वाण लुटले जाते़ आता या समारंभाला सार्वजनिक स्वरुप आले असून, त्यातून आता महागड्या पैठणी

सोन्याची नथ अन् चांदीचा छल्ला!
पिंपरी : मकरसंक्रातीला महिला घरोघरी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. त्यात सौभाग्याचे वाण लुटले जाते़ आता या समारंभाला सार्वजनिक स्वरुप आले असून, त्यातून आता महागड्या पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला अशा वस्तू लुटल्या जात आहेत. महिला नगरसेविकांसह हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात पुरुष नगरसेवकदेखील आता मागे नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल अशा समारंभातून जाणवत आहे.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे़ या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे़ महापालिकेत १२८ नगरसेवकांपैकी ५२ टक्के महिला नगरसेविका आहेत़ त्यातील
काही अपवाद वगळता जवळपास सर्वच नगरसेविका व त्यांचे पती
पुन्हा निवडणुकीच्या तयारीला
लागले आहेत़
हळदी-कुंकू कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतात. जुन्या पिढीतील काही नगरसेवकांच्या सौभाग्यवतींनी अशा कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात साधारण ३० वर्षांपूर्वी केली होती़ त्या वेळी वाण म्हणून झारे, छोटी भांडी दिली जात होती. मात्र, महिला आरक्षण सुरु झाल्यानंतर अशा धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमातून महिलांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी स्पर्धाच सुरु झाली आहे.इच्छुक ‘माननीय’ आताच लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत.(प्रतिनिधी)