शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:11 IST

वटपौर्णिमेला लक्ष्य करून बुधवारी चोरट्यांनी शहरात धुडकुल घालत १३ महिलांच्या सोन्याच्या साखळ्यांची चोरी केली होती.

ठळक मुद्देपोलिसांचा पाठलाग अयशस्वी : एकूण १५ जबरी चोऱ्या

पुणे : वटपोर्णिमेचा मुहूर्त साधून बुधवारी संपूर्ण शहरात धुमाकूळ घालणारे मोटारसायकलवरील दोघे चोरटे नाकाबंदीत पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटण्यात यशस्वी ठरले़. त्यांनी बुधवारी दिवसभरात तब्बल १५ ठिकाणी महिलांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते़. लष्कर, शिवाजीनगर, सांगवी, वाकड, पाषाण करीत ते मार्केटयार्डला आले, तेथून कात्रज कोंढवा रोडवर गेले़. त्यानंतर त्यांनी घोरपडीतील आयप्पा मंदिरासमोर एक महिलेची सोनसाखळी हिसकावली़. तेथून ते २ ते ३ किलोमीटरवर असलेल्या रामटेकडीत शिरले़. तेथे एका महिलेचे मंगळसुत्र हिसकावून पुढे जात होते़. तोपर्यंत शहरात सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली होती़. संपूर्ण शहरात पोलीस चोरट्यांच्या शोधासाठी फिरत होते़ रामटेकडी येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याला ते संशयित दिसल्याने त्याने सर्वांना सतर्क केले़. एका मार्शलने त्याला पाठलागही केला़. मार्शलने त्यांच्या गाडीला धक्का दिला़. त्याने त्या चोरट्यांची गाडी डगमगली़. मात्र, त्यांना धक्का देणाऱ्या मार्शलचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो खाली पडला़. ही संधी साधत ते सुसाटपणे पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे़. सोनसाखळी चोरटे इराणी असून त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांनी काही ठिकाणी पथके रवाना केली आहेत़. सीसीटीव्हीवरुन मिळालेल्या फुटेजची पडताळणी करुन त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले़. घोरपडी येथील ३० वर्षांची महिला दुपारी पावणेतीन वाजता मुलीला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी पायी जात असताना मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली़. त्यानंतर काही अंतरावरील रामटेकडी येथील सतिश कसबे यांच्या कार्यालयासमोर आणखी एका महिलेचे दागिने हिसकावले़ रामटेकडी येथील ४० वर्षांची महिला वटपूजा करुन घरी पायी जात असताना दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून नेले़. हे दोन्ही गुन्हे बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले़. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाGoldसोनंWomenमहिलाPoliceपोलिस