शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

अलंकापुरीत रंगला श्रींचा वैभवी रथोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:29 AM

हरिनामाच्या गजरात मग्न झाले वैष्णव...

ठळक मुद्देश्रींचा ७२४ वा संजीवन समाधी दिन सोहळा

आळंदी : वीणा, टाळ, मृदंगाच्या त्रिनादासह माऊली माऊली... श्री विठ्ठल श्री विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा नामगजरासह जयघोष करीत रविवारी (दि. २४) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा रथोत्सवात पूजा बांधत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा झाला. रथोत्सव मिरवणुकीदरम्यान ग्रामप्रदक्षिणेसाठी पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाचा नामजयघोष झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे हात श्रींचे रथोत्सवातील रथ ओढण्यास सरसावले. उद्या सोमवारी (दि. २५) आळंदीत श्रींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा होत आहे. ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीने नगरप्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली. यावेळी रस्त्यांचे दुतर्फा उभे राहून श्रींचे दर्शन घेत भाविकांनी रथ हाताने ओढत आपली सेवा रुजू केली. तत्पूर्वी श्रींची पालखी मंदिरातून खांद्यावर घेत रथोत्सवास गोपाळपुरात परंपरेने नामगजरात आणण्यात आली. द्वादशी दिनी रविवारी दुपारी श्रींच्या महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. श्रींचा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले. तत्पूर्वी मंदिरात श्रींना पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाली. परंपरेने खेडचे प्रांत संजय तेली यांचे हस्ते पंचोपचार पूजा झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, तहसीलदार सुचित्रा आमले, मंडलाधिकारी चेतन चासकर, मुख्याधिकारी समीर भूमकर आदी उपस्थित होते. द्वादशीला श्रींचा रथोत्सवास जाण्यास मंदिरातून श्रींची पालखी चांदीचा वैभवी मुखवटा फुलांनी सजलेल्या चांदीचे पालखीत पूजा बांधत विराजमान करण्यात आला. श्रींची पालखी खांद्यावर घेत महाद्वारातून शनिमंदिरमार्गे गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात आली. श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली. रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक राहुल जाधव, श्रींचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, बाळासाहेब कुºहाडे, श्रींचे मानकरी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते...........पूजेच्या काळात परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी श्रींच्या रथोत्सवात सहभागी होण्यास जमले. श्रींची पूजा होताच माऊलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी रथात ठेवण्यात आला. दरम्यान, श्रींचा रथ श्रीकृष्ण मंदिरासमोर येताच भाविक वारकºयांच्या दिंडीतून भगव्या पताका उंचावत माऊली माऊलीचा गजर करीत रथोत्सव सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी चौकमार्गे हरिनाम गजरात झाली. मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. मंदिर प्रदक्षिणा, धुपारती झाली. दरम्यान, मंदिरात वीणामंडपात हरिभाऊ बडवे, केंदूरकरमहाराज यांच्यावतीने परंपरेने कीर्तनसेवा झाली. कीर्तनानंतर श्रींच्या गाभाºयात निमंत्रित खिरापत प्रसाद, प्रसादवाटप वीणामंडपात, फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले. ..........आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संत ज्ञानेश्वरमहाराज यांचा ७२४ वा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत सोमवारी (दि. २५) अलंकापुरीनगरीत साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील धर्मशाळांसह माऊली मंदिर, इंद्रायणी नदीघाटावर श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तनसेवा होणार आहे. तत्पूर्वी माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते श्रींना पवमान अभिषेक व दुधारती होईल. भाविकांच्या महापूजा व संत नामदेवराय यांच्यावतीने श्रीना नामदासमहाराज परिवाराच्यावतीने महापूजा होईल. परंपरेने वीणामंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तनसेवा रुजू होईल. सकाळी दहा वाजता नामदासमहाराज यांच्या परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन होणार आहे. दरम्यान, महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराच्या सुमारास श्रींच्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षाव, आरती व घंटानाद होणार आहे. 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर