येरवडयात अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पत्नीला पाजले फिनाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:03 IST2018-08-18T14:53:52+5:302018-08-18T15:03:31+5:30
पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला मारहाण करुन जबरदस्तीने फिनाईल पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़.

येरवडयात अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पत्नीला पाजले फिनाईल
पुणे : पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला मारहाण करुन जबरदस्तीने फिनाईल पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. ही घटना येरवड्यातील यशवंतनगर येथे घडली आहे़ याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी तिचा पती संतोष शिवाजी खवळे व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़.
तिच्या पतीचे त्यांच्याच वस्तीत राहणाऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध आहेत़ हे या महिलेला समजल्यावर तिने त्याला विरोध केला़. त्यावरुन त्यांच्यात यापूर्वी अनेकदा वाद झाले होते़. १५ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीही त्यांच्यात वाद झाला़. तेव्हा त्याने दुसऱ्या महिलेबरोबर संगनमत करुन फिर्यादीला हाताने मारहाण व शिवीगाळ करुन जबरदस्तीने तोंडात फिनाईल ओतले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे़. या प्रकाराने या महिलेला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले़. येरवडा पोलिसांनी पती व दुसऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक बोडके अधिक तपास करत आहेत़.