शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा खेळखंडोबा! एक ते दाेन लाख द्या अन् पदवी घ्या; पदव्या विकण्याचा गाेरखधंदा जाेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:14 IST

विद्येच्या माहेरघरातच सुरू असलेला पदव्या विक्रीचा हा बाजार विद्यार्थ्यांना लाखाेंचा गंडा घालणारा

ज्ञानेश्वर भोंडे 

पुणे : अगदी काही हजारांपासून एक ते दाेन लाख रुपये द्या अन् हवी ती पदवी घेऊन जा, असा गाेरखधंदाच काही संस्थांनी थाटला आहे. विद्येच्या माहेरघरातच सुरू असलेला पदव्या विक्रीचा हा बाजार विद्यार्थ्यांना लाखाेंचा गंडा घालणारा आहे. फसवणूक हाेण्याचा धाेका असतानाही अनेकजण आकर्षक जाहिरातीला बळी पडत असल्याचा प्रकार समाेर येत आहे.

‘भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यवसाय प्रबंधन अध्यायन संस्थान’ या नावाने अहमदनगर येथे पैसे घेऊन बनावट पदव्या विक्रीचा धंदा सुरू असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी काेथरूड पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हाही दाखल केला आहे. त्यावरून हा धंदा किती फाेफावला आहे हे दिसून येते. याला बळी पडणारेही तितकेच जबाबदार असले तरी त्यांची हाेणारी आर्थिक फसवणूक चिंतेची बाब आहे.

पुण्यातही याआधी असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर कारवाई हाेऊन ते बंद पडले असले तरी अजूनही या प्रकारांना हवा तितका आळा बसलेला नाही. पुण्यात सन २०१८ मध्ये पुरंदर विद्यापीठ नावाने अनेक पदव्या विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. हे विद्यापीठ म्हणजे सासवडमध्ये तीन खाेल्या आणि एक शिपाई इतकेच मर्यादित हाेते. त्यांनी तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना बाेगस पदव्या वाटप केल्या हाेत्या. या तथाकथित संस्थेवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.

अशी मिळते डीग्री

- इंजिनिअरिंग, बी.टेक., एम.टेक. पासून अगदी डाॅक्टरेटच्या पदव्या मिळतील, अशी जाहिरातबाजी संबंधित संस्था शक्यताे साेशल मीडियाद्वारे करतात.- संबंधित क्षेत्रात पदवी मिळवू इच्छिणारे लागलीच फाेन करतात. त्यावर संबंधित संस्था भेटायला बाेलून किंवा फाेनवरच थेट पैसे भरा आणि हवी ती डिग्री घेऊन जा असे सांगतात. या पदव्या किंवा पदविकांचा दरही २५ हजारांपासून काही लाखांपर्यंत असताे.

कशी ओळखाल बाेगस संस्था?

- ज्या संस्था पैसे घेऊन त्वरित पदवी देण्याचा दावा करतात किंवा पदव्या देतात, त्या १०० टक्के बाेगस असतात.- ज्या संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटी), विद्यापीठ अनुदान आयाेग (यूजीसी) यांच्याकडे नाेंद नसते. (या दाेन्ही परिषदांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या संस्थांची यादी जाहीर केलेली असते. त्यांच्या यादीत नसलेल्या संस्था बाेगस असतात.)- यूजीसी हे उच्च शिक्षणातील पदवी देते, तर एआयसीटी हे तंत्रशिक्षणातील पदवी बहाल करते. त्यांच्याकडे नाेंद नसलेल्या मात्र, संबंधित पदव्या देणाऱ्या संस्था बाेगस असतात.

आराेग्याप्रमाणे शिक्षणातही बाेगस डाॅक्टर!

वैद्यकीय शिक्षण न घेता काही बाेगस डाॅक्टर रुग्णांवर उपचार करण्याची प्रॅक्टिस करतात. शिक्षण विभागातही संशाेधनाद्वारे डाॅक्टरेट ही पदवी मिळते. परंतु काही जणांनी हजाराे रुपये भरून बाेगस पीएच. डी. मिळवत स्वत:च्या नावापुढे डाॅक्टरेट लावत आहेत.

चाैकशी करून संबंधित दाेषी संस्थांवर कारवाई  करणार 

''बाेगस पदव्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने याआधीच परिपत्रके काढली आहेत. पैसे घेऊन पदव्या विक्री करणाऱ्या संस्था माहीत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांनी तत्काळ उच्च शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच काेणत्याही संस्थेत प्रवेश घेताना त्या संस्थेची शासकीय ध्येयधाेरणानुसार मान्यता, कागदपत्रांची पडताळणी करावी. त्यांची पूर्ण माहिती घ्यावी. जाहिरातीला बळी पडू नये. आमच्याकडे तक्रार आल्यास त्याची चाैकशी करून संबंधित दाेषी संस्थांवर कारवाई करण्यात येईल असे उच्च शिक्षण संचालक डाॅ. धनराज माने यांनी सांगितले. ''

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीfraudधोकेबाजीPoliceपोलिस