‘जानकर सोबत आल्यास लोकसभेची जागा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:25 IST2024-03-04T10:24:26+5:302024-03-04T10:25:33+5:30

जानकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांना सोबत घेण्यास मी आग्रही असल्याचेदेखील ते म्हणाले.

give my Loksabha seat if Jankar comes with him | ‘जानकर सोबत आल्यास लोकसभेची जागा’

‘जानकर सोबत आल्यास लोकसभेची जागा’

बारामती : महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र आता अंतिम टप्प्यात आले असून, येथे सहा व सात मार्च रोजी मुंबईत यासंदर्भातील बैठक आहे, अशी माहिती, शरद पवार यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सोबत आल्यास त्यांना मी माझी लोकसभेची जागा द्यायला तयार असल्याचे पवार म्हणाले. जानकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांना सोबत घेण्यास मी आग्रही असल्याचेदेखील ते म्हणाले.

पवार म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या जागा वाटपाचे सूत्र ठरेल.  जानकर सोबत आल्यास त्यांना मी माझी लोकसभेची जागा द्यायला तयार आहे.

Web Title: give my Loksabha seat if Jankar comes with him