शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'८ दिवसात ५ लाख दे', जेजुरी शिंदे गटाच्या युवासेना प्रमुखावर खंडणी अपहरणाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:04 IST

माझी पोरे कमरेला घोडे लावून फिरतात, तुला मारायला मला वेळ लागणार नाही, ८ दिवसात ५ लाख द्यायचे आणि दर महिन्याला ५० हजार द्यायचे

जेजुरी : जेजुरी शहर शिवसेनेचे (शिंदे गट) युवासेना प्रमुख ओंकार नारायण जाधव (रा. जेजुरी) व हर्षल गरुड (रा. बेलसर) यांच्यासह इतर पाचजणांवर अपहरण करणे, खंडणी मागणे, पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे आदी गुन्ह्यांबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बजरंग हनुमंत पवार (रा.पवारवाडी, जेजुरी) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांकडून मिळालेले थोडक्यात वृत्त असे की, बजरंग पवार शनिवारी (दि. ३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेजुरीतून आपल्या दुचाकीवरून घरी निघालेले असताना त्यांच्या दुचाकीला हर्षल गरुड याने अडवले. ओंकार जाधव व इतरांनी त्यांना चारचाकी वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून मावडी पिंपरी गावच्या हद्दीतील एका शेतात नेले. तेथे डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी व शिवीगाळ करत पाच लाख रुपयांची मागणी केली तसेच मला माझी गॅंग सांभाळावी लागते. माझी पोरे कमरेला घोडे लावून फिरतात, तुला मारायला मला वेळ लागणार नाही. तुझे एमआयडीसीमध्ये वेस्टेज उचलण्याचा व्यवसाय आहे. मला आठ दिवसात पाच लाख रुपये द्यायचे आणि दर महिन्याला ५० हजार रुपये द्यायचे, अशी मागणी करीत आठ दिवसांत पैसे देण्याची मागणी करत पुन्हा मोरगाव चौक जेजुरी येथे आणून सोडले.

याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०८(२), १३७ (२), १४० (२), ३५२, ३५१, १८९(२), १९१ (२) शस्त्र प्रतिबंधक कायदा ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत. सर्व आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) शहर युवासेना प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ माजली असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना