ग्राहकांना द्या मोफत पाणी; शहरातील सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 07:04 AM2018-04-28T07:04:03+5:302018-04-28T07:04:03+5:30

शहरातील बहुतांशी मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

Give customers free water; Notice to all the malls in the city, shopping center | ग्राहकांना द्या मोफत पाणी; शहरातील सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटिसा

ग्राहकांना द्या मोफत पाणी; शहरातील सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटिसा

Next

पुणे : शहरातील विविध मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोफत पाणीपुरवठा व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध
करून देण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. या संदर्भात सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील बहुतांशी मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात. सध्या शहरातील मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये एक लिटर पाण्याच्या बॉटलसाठी ३० ते ४५ रुपये मोजावे लागतात. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना जास्तीचे दर द्यावेच लागतात. त्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राणी भोसले यांनी मांडला होता. या प्रस्तावावर शुक्रवारी (दि. २७) झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

स्वच्छतागृहाची सेवाही देण्याचे आदेश
शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे
यांनी सांगितले, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नियमानुसार
मोफत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
अनेक मॉलमध्ये ही सुविधा दिली जात नाही.

यामुळेच शहर सुधारणा समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करून सर्व मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत प्रत्येक मॉलने दर्शनी भागावर ‘येथे पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.’ असे स्पष्ट लिहिण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटिसा देण्यात येणार असून, अशी सुविधा न देणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Give customers free water; Notice to all the malls in the city, shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी