शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीप्रमाणेच कमिशन द्या; विविध मागण्यांसाठी पोस्टल एजंट रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 16:42 IST

विविध कारणावरुन द आॅल इंडिया महिला प्रधान आणि स्मॉल सेव्हींग्ज फेडरेशनच्या वतीने गुरुवारी शाहू उद्यान ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढण्यात आला.  

ठळक मुद्देकामाच्या पद्धतीत बदल करीत, पोस्टल एजंट्सवर दोन पोस्टाचे बंधन घालण्यात आले आहे.पोस्टाच्या नवीन योजना या थेट सुरु करण्यात येत आहेत. एजंटांना त्यात स्थान नाही. या आंदोलनात शहरातील सुमारे दोनशे एजंट सहभागी झाले होते.

पुणे : पोस्टल एजंटांच्या (मध्यस्थ) कमिशनमध्ये केलेली कपात, कामाच्या पद्धतीत केलेला बदल अशा विविध कारणावरुन द आॅल इंडिया महिला प्रधान आणि स्मॉल सेव्हींग्ज फेडरेशनच्या वतीने गुरुवारी शाहू उद्यान ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढण्यात आला.  पोस्टल एजंटांचे कमिशन १ वरुन अर्धा टक्के करण्यात आले असून, त्यांचा प्रोत्साहन भत्ता (इन्सेन्टीव्ह) देखील बंद करण्यात आला आहे. पीपीएफ आणि ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक एजंटांकडून काढण्यात आली आहे. पोस्टल एजंट हे पूर्वी सर्व पोस्टात काम करीत असत. या कामाच्या पद्धतीत बदल करीत, त्यांना दोन पोस्टाचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे एजंटांच्या कामावर मर्यादा आल्या आहेत. पोस्टाच्या नवीन योजना या थेट सुरु करण्यात येत आहेत. एजंटांना त्यात स्थान नाही. एकीकडे महागाई वाढत असताना कमिशनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी नोकरांना पाचवा अणि सहावा आयोग लागू करण्यात आला आहे. एजंटांना मात्र डावलण्यात येत आहे. एजंटांना पूर्वी प्रमाणेच कमिशन देण्यात यावे. एजंटांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी शामला गोपीनाथ आयोगाऐवजी दुसरा आयोग नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. शहरात एक हजार एजंट असून, त्यात महिलांचे लक्षणीय प्रमाण आहे. आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे कोषाध्यक्ष कौस्तुभ ठकार यांनी सांगितले. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष राजश्री भगत आणि शहरातील सुमारे दोनशे एजंट सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनcollectorतहसीलदार