युवकाने मागीतली जिल्हाधिकार्‍यांना स्वेच्छा  मरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 08:32 PM2017-09-12T20:32:28+5:302017-09-12T20:32:28+5:30

शिवणी : स्थानिक रहिवासी सिद्धार्थ वाहुरवाघ यांनी  जिल्हाधिकार्‍यांना ८ सप्टेंबरला दिलेल्या निवेदनात स्वेच्छा  मरणाची परवानगी मागितली.

The youth allowed the District Collector to voluntarily die | युवकाने मागीतली जिल्हाधिकार्‍यांना स्वेच्छा  मरणाची परवानगी

युवकाने मागीतली जिल्हाधिकार्‍यांना स्वेच्छा  मरणाची परवानगी

Next
ठळक मुद्देनिवेदनात बँके व्यवस्थापकाकडून कर्ज दिले जात नसल्याचे   नमूदसदर युवक सुशिक्षित बेरोजगार जनरल स्टोअर्स टाकण्यासाठी महामंडळाकडे केला होता  अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिवणी : स्थानिक रहिवासी सिद्धार्थ वाहुरवाघ यांनी  जिल्हाधिकार्‍यांना ८ सप्टेंबरला दिलेल्या निवेदनात स्वेच्छा  मरणाची परवानगी मागितली.
गेल्या २0 महिन्यापासून महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाने  कर्ज मंजूर करून देखील शिवर/ शिवणी येथील एका  बँकेच्या व्यवस्थापकाकडून कर्ज दिले जात नसल्याचे  निवेदनात लिहीले आहे. सदर युवक सुशिक्षित बेरोजगार  असल्याने कर्जाची आवश्यकता असल्याने महामंडळाकडे  जनरल स्टोअर्स टाकण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला होता.  त्यानुसार दोन लाख २५ हजार रुपयांचे कर्ज बँकेकडून  देण्याचे पत्र देखील मिळाले. परंतु कोटा नाही, दोन महिन्यांनी  भेटा, सद्या देता येत नाही असे उत्तरे देण्यात येत असल्याने  मोठा मानसीक त्रास युवकास होत आहे.
युवकाच्या मृत्यू पश्‍चात शिवर/ शिवणी राष्ट्रीयकृत बँकेच्या  व्यवस्थापक तथा महामंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध भादंवि ३७९  कलमानुसार कठोर कार्यवार्ही करण्यात यावी, असे निवेदना त नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, राज्य पाल, लोकायुक्त, पालकमंत्री, महामंडळ अध्यक्षांना  पाठविण्यात आल्या आहेत. 

Web Title: The youth allowed the District Collector to voluntarily die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.