शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
5
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
6
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
7
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
8
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
9
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
10
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
11
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
12
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
13
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
14
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
15
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
16
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
17
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
18
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
19
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
20
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

Pune: हॉस्टेलमधील मुलींची छेड काढली; सुनेने घेतला चावा, कानावर पाच टाके, पोटावरही वार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:51 IST

सून इतकी चिडली की तिने कानाचा चावा घेतला, पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले; तो व्यक्ती रुग्णालयात दाखल

पुणे : जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना हॉस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरून हॉस्टेल चालक व त्याच्या सुनेने तरुणाला मारहाण केली. सुनेने कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले. याबाबत मिलिंद वसंत कोठारी (४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (६०) व त्यांची सून यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करून घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स हॉस्टेल चालवणारे सुरेश विठ्ठल कांबळे व त्यांची सून आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली. त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी पुढील तपास करत आहेत

 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यsasoon hospitalससून हॉस्पिटलhotelहॉटेल