शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेयसीकडून प्रियकराचा कोयत्याने गळा चिरुन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:00 IST

प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला आहे.

पुणे / धायरी - प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना नर्‍हे येथील एस के नाईक कंपनीसमोर मंगळवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. प्रियकरांचा खून केल्यानंतर ही तरुणी स्वत: च पोलीस चौकीत हजर झाली. रक्ताने माखलेल्या हाताने तिने मी खून केला असे तेथील पोलिसांना सांगितल्यावर त्यांची एकच खळबळ उडाली.

अनुराधा करे ( वय २४, रा़ नारायण निवास, नर्‍हे - धायरी रोड, नर्‍हे,  मूळ, करेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली) असे आरोपीचे नाव असून महंतेश बिरादार ( वय २८, रा. संख किरंडी, तालुका जत, जिल्हा सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनुराधा व महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता. परंतु त्यानंतर तो तिला भेटावयास टाळाटाळ करीत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला.  रात्री त्याने माझे लग्न झाले असल्याचे तिला सांगितले. यावरून त्यांच्या दोघांत वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला. 

महंतेश झोपलेला असताना पहाटे साडेचारच्या सुमारास तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळविले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वत: पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण

द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMurderखून