उरुळी कांचन येथे मित्राचाच तरुणीवर हल्ला; तरुणी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:30 IST2018-01-22T13:28:01+5:302018-01-22T13:30:39+5:30

मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने धारदार हत्याराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Girlfriend attacked in Uruli Kanchan; The girl seriously injured | उरुळी कांचन येथे मित्राचाच तरुणीवर हल्ला; तरुणी गंभीर जखमी

उरुळी कांचन येथे मित्राचाच तरुणीवर हल्ला; तरुणी गंभीर जखमी

ठळक मुद्देहल्ला करून आरोपी फरार, पीडित तरुणीने पोलिसांत केली तक्रार दाखलजखमी झालेल्या तरूणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल

उरुळी कांचन : मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने धारदार हत्याराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अमोल विलास चौधरी (रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव असून, हल्ला करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूळी कांचन, खेडेकर मळा जवळील हॉटेल अशोकाच्या पाठीमागे आरोपी अमोल चौधरी याने तरुणीला रस्त्यावर अडवून मित्राला तुझ्या मैत्रिणीचा संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन धारदार हत्याराने तरुणीच्या पोटात, हातावर वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गुन्हाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

Web Title: Girlfriend attacked in Uruli Kanchan; The girl seriously injured