पाचव्या मजल्यावरुन उडी मारत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न , रायसोनी कॉलेजमधील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 07:08 PM2018-04-28T19:08:07+5:302018-04-28T19:08:07+5:30

वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

girl suicide try by jumping from fifth floor, shocking incident at Raisoni College | पाचव्या मजल्यावरुन उडी मारत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न , रायसोनी कॉलेजमधील धक्कादायक घटना

पाचव्या मजल्यावरुन उडी मारत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न , रायसोनी कॉलेजमधील धक्कादायक घटना

Next
ठळक मुद्दे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुणे: वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शनिवारी (दि.२८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 
रश्मी प्रभू करनेवाड (वय २२ , रा. नाशिक) असे या मुलीचे नाव आहे. उडी मारल्यानंतर तिला जवळच्या लाईफ लाईन हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. बीई इलेक्ट्रॉनिकच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्यामुळे मात्र तिला रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहे. 

Web Title: girl suicide try by jumping from fifth floor, shocking incident at Raisoni College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.