शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'तू पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीसारखी दिसते', म्हणत पुण्यात मुलीची काढली छेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:45 IST

आरोपीकडून भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न...

पुणे : ‘तू पुष्पा चित्रपटातील नायिका श्रीवल्लीसारखी दिसतेस,’ असे एका मुलीला म्हणून एका टोळक्याने तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे.

सहकारनगर पोलिसांनी सोहेल व त्याचा साथीदार आरबाज या दोघा टोळभैरवांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील लहुजी समाज मंदिराजवळ शनिवारी रात्री ९ वाजता घडला.

याप्रकरणी धनकवडीतील एका २० वर्षांच्या तरुणीने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सध्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. सोहेल व आरबाज हे दोघे फिर्यादीच्या घरासमोर येथून शिट्ट्या मारत असत.

त्यावर फिर्यादी हिने त्यांना शिट्ट्या का वाजवतो, असे विचारले. तेव्हा सोहेल याने तू पुष्पामधील हिरोईनसारखी दिसतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिचा हात धरून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तिचा भाऊ फिर्यादीला सोडविण्यासाठी आला असताना आरबाज याने त्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघांनी आरडाओरडा केल्यामुळे आरोपी तेथून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDhankawadiधनकवडीMolestationविनयभंग