राजगुरुनगर येथे युवतीचा विनयभंग करत आरोपींची एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:58 IST2018-05-07T14:58:45+5:302018-05-07T14:58:45+5:30
एका १७ वर्षीय युवतीचा विनयभंग व युवतीच्या मावसभावाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजगुरुनगर येथे युवतीचा विनयभंग करत आरोपींची एकाला मारहाण
राजगुरुनगर :येथे वाडा रस्त्यावर एका १७ वर्षीय युवतीचा विनयभंग व युवतीच्या मावसभावाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती राजगुरुनगर शहरातून रविवारी (दि. ६) रोजी वाडा रस्त्याने जात असताना आरोपी स्वप्नील होले (रा. होलेवाडी, ता. खेड) व त्याचा मित्र हे दुचाकीवरून आले. त्यांनी पीडित युवतीला रस्त्यात अडविले. होले याने तिचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळेस युवतीचा मावसभाऊ तेथून जात होता. त्याने याबाबत त्या आरोपींना जाब विचारला असता होलेने युवतीच्या मावसभावाच्या नाकावर दगड मारला तर त्याच्या मित्राने पाठीवर दगडाने मारहाण केली. यानंतर युवतीचा मामा होले यास भेटण्यास गेला असता त्यांना देखील धक्काबुकी करून ढकलून दिले. होले हा गेले वर्षभर त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव करत आहेत.