शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू; ५ तास ठिय्या मांडल्यानंतर अधिका-यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 14:25 IST

मुलीचे वडील हे भंगारचा दुकान चालवत असून तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

इंदापूर : इंदापूरच्या दर्गा मस्जिद चौकाजवळ ६ वर्षीय बालिकेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महावितरण विभाग व नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिका-यांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान घराशेजारी भावंडांबरोबर खेळत असणा-या  कुलसुम हैदर मुशाहिदी (वय ६ वर्षे,रा.दर्गा मस्जिद चौक,माळीगल्ली, इंदापूर) या बालवाडीत शिकणा-या मुलीस महावितरण विभागाचा वीजेचा खांब व त्याच्या शेजारच्या भूमिगत वीजवाहिनीचा बॉक्स या दोन्हींचा विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. या संदर्भात तिचे वडील हैदर छोटन मुशाहिदी व शहरातील सुमारे तीनशेहून अधिक नागरिक महावितरण विभागाचे अधिकारी व नगरपरिषदेच्या अधिका-यांविरुध्द तक्रार देण्यासाठी इंदापूर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तो वीजेचा खांब नेमका कोणाच्या अखत्यारित येतो या वरुन पोलीस त्यांच्याशी वाद घालत बसले. त्यामुळे तक्रार दाखल होईना.

अखेर जोवर तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शिंदे, प्रा.कृष्णा ताटे, शकील सय्यद, ॲड. आशुतोष भोसले, अमजद बागवान, अस्लम बागवान, जकीर काजी, अश्फाक इनामदार, अक्रम शेख, ॲड इनायत काजी व इतरांनी घेतला. रात्री आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हे सर्वजण पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून बसले. नरमलेल्या पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. रात्री तीन वाजता त्या बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुलसूमचे वडील हे भंगारचा दुकान चालवतात. मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावितरणच्या हलगर्जी व बेजबाबदारपणामुळे आमच्या चिमुकलीचा बळी गेल्याचा कुटुंबीयांनी व नागरिकांनी आरोप केला आहे. शहरात अनेक ठिकाणची विद्युत रोहित्रे उघड्यावर आहे. गंजलेले वाकलेले विद्युत खांब, दुरावस्थेत असणा-या विद्युत तारा अनेक ठिकाणी आढळतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने तातडीने उपाययोजना करावी. आवश्यक त्या ठिकाणी खांबांना वीज प्रतिरोधक आवरण बसवावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूelectricityवीजmahavitaranमहावितरण