जिलेटीनच्या स्फोटाने १७ बोटी उडविल्या

By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:15+5:302016-03-16T08:38:15+5:30

बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, करमाळ््याचे तहसीलदार संजय पवार, इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी

Gillette blast blown 17 ships | जिलेटीनच्या स्फोटाने १७ बोटी उडविल्या

जिलेटीनच्या स्फोटाने १७ बोटी उडविल्या

इंदापूर : बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, करमाळ््याचे तहसीलदार संजय पवार, इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी यांच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर हल्लाबोल करून, १७ बोटी जिलेटीनच्या स्फोटाने उडवून टाकल्या. चार जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू राहण्याचे संकेत तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिले आहेत.
नेमत अजीज शेख (वय ३०), आतिष इस्माईल शेख (वय २२), सलीम शेख (वय १८), दालिम शेख (वय २०, सर्व रा. बेरपूर, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना कुगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)

सकाळी साडेअकरा वाजता कालठण, कळाशी, शिरसोडी तसेच करमाळा भागात वांगी या भागात कारवाई सुरू करण्यात आली. इंदापूर तालुक्यात १२, तर करमाळा तालुक्यात ५ बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या.
- सूर्यकांत येवले, तहसीलदार (इंदापूर)

Web Title: Gillette blast blown 17 ships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.