शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी

By admin | Updated: January 28, 2017 00:05 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा,

मंचर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पुणे जिल्ह्यातही दिवाळीनंतर मे महिन्यापर्यंतच्या काळात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. गावोगावी होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती पाहताना अथवा त्यात सहभाग घेताना शेतकरी आपली सारी दु:खे विसरून आनंद घेत असतो. काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैल या प्राण्याचा अधिसूचित प्राण्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवर बंदी लादली गेली आहे. या बंदीविरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली असून, सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाडा मालकांच्या संघटना व मी स्वत: लढा देत आहे.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असून, त्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढून बैल हा प्राणी पर्यावरण विभागाच्या अधिसूचित यादीतून वगळण्याची गरज आहे. आपण तमिळनाडूच्या धर्तीवर आचारसहिंता संपल्यानंतर वटहुकूम काढण्याचे जाहीर केले असले, तरी त्या वटहुकमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, हे आज तमिळनाडूच्या वटहुकमाला देण्यात आलेल्या न्यायालयातील आव्हान याचिकेमुळे स्पष्ट झाले आहे.