शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मोटार परवाना काढा अन्यथा घरी बसा; तुकाराम मुंढे यांचा पीएमपी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:58 IST

पीएमपीतील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे.

ठळक मुद्देमुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नियमांवर बोट ठेवत कामाला केली सुरूवात परवाना बंधनकारक, अन्यथा संबंधितांवर कारवाई : तुकाराम मुंढे

पुणे : मोटार वाहतुक कामगार कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)तील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे.पीएमटी व पीसीएमटीच्या एकत्रीकरणातून २००७ पीएमपी या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. मात्र, मागील दहा वर्षांत कंपनीची वाटचाल कंपनीची रचना, विविध वाहतुकविषयक कायदे याप्रमाणे क्वचितच पाहायला मिळाली. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नियमांवर बोट ठेवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी कामाची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यातून भोंगळ कारभाराची प्रचिती आली. मोटार वाहतुक कामगार कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कायद्यानुसार ‘पीएमपी’मधील आगार व्यवस्थापक, आगार अभियंते तसेच तांत्रिक विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये बहुतेकांकडे हा परवाना नाही. त्याअनुषंगाने परवाना नसलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आगार व्यवस्थापक, आगार अभियंते, सहायक अभियंते, मेकॅनिक, टाईम कीपर, इतर तांत्रिक कर्मचाºयांचा त्यामध्ये समावेश आहे. बसच्या देखभाल-दुरूस्तीमध्ये या सर्वांचा थेट संबंध येत असतो. त्याची केवळ तांत्रिक माहिती असून उपयोग होत नाही. ही बस चालविता येणेही अपेक्षित आहे. त्याशिवाय त्यातील तांत्रिक बाबी पुर्णपणे कळणार नाही. तसेच मार्गावर बस चालविताना चालकांना येणारे अडथळे, त्यासाठी घ्यावयाची काळजी, तांत्रिक बिघाड, ब्रेक, क्लचचा वापर या सर्व बाबींची माहिती संबंधितांना हवी. त्यासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना मिळविणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे. 

कायद्यानुसार आगार प्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिकाऱ्यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा परवाना नाही, त्या सर्वांना काही दिवसांपुर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल.- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPMPMLपीएमपीएमएल