शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतली; पुणे महापौरांच्या दालनात विरोधकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 18:47 IST

Pune municipal Politics : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते.

राज्यशासनाची परवानगी आलेली असुनही महापालिकेची सभा ॲानलाईन घेतल्याचा निषेध करत पुणे महापालिकेत विरोधकांनी आज ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी भाजप मुस्कटदाबी करत भ्रष्टाचार रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र फक्त पुण्यातच परवानगी का? मुंबई महापालिकेची सभा का चालवत नाही असा प्रश्न विचारला आहे. 

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्याची परवानगी राज्य शासनाने अखेर दिली आहे. मात्र, आजची सभा प्रभाग समिती मधून व्हिडीओ कॅान्फरन्सिंग द्वारे घेण्याचा निर्णय आधीच जाहीर झाल्या असल्याने नगरसेवकांना जवळपास वर्षभरानंतरही महापालिकेच्या सभेला सभागृहात हजर राहण्याची संधी मिळाली नाही. याचाच निषेध करत विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात ठिय्या मांडत निषेध केला. 

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते. तर सभा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या राज्य सरकारने घेतला आहे। आम्ही त्यांना विनंती करुनही त्यांच्याकडुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला होता. 

याबाबत नुकताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. पवार सकारात्मक असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांची केल्यानंतरही महापौरांनी मात्र अधिक्ृत पत्र आल्यावरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. अखेर राज्य शासनाने महापालिका आयुक्तांचे कोरोनाचे नियम पाळत सभेला परवानगी दिली. 

पण यापुर्वीच व्हिडीओ कॅान्फरंसींगचा निर्णय झाला असल्याने आज प्रभाग समित्यांमधुनच व्हिडीओ काॅन्फरंन्सींग द्वारे सभा घेण्याचा निर्णय झाला. पण यावरुनच गोंधळ घालत विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं. भ्रष्टाचार करत निर्णय रेटायचे असल्यानेच सत्ताधारी सभा होवु देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला. 

तर विरोधकांचे वर्तन बेजबाबदार पणाचे आहे असं म्हणत नगरविकास खात्याने फक्त पुण्यासाठीच आदेश कसा काय काढला असा प्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला. “ सभा घ्यायचीच तर मुंबईसह इतर महापालिकांची का घेतली जात नाही? मुॅबईची सभा चालवु देत नाहीत मग फक्त पुण्यासाठीच आदेश का निघतो ?” असं मोहोळ म्हणाले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस