शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

Pune: गावठी कट्ट्यांना ‘चाप’ लावणार कसा? गाेळीबाराचे सत्र सुरूच, खबऱ्यांचे नेटवर्क बळकट करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:15 AM

एकीकडे लाेकसभा निवडणुकीची धामधूम, दुसरीकडे गोळीबाराची मालिका असे चित्र असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे....

- नितीश गोवंडे

पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराचे सत्र सुरूच आहे. बुधवारी (दि. २४) पहाटेही तळेगाव परिसरात गोळीबाराची घटना घडली. आदल्याच दिवशी अर्थात मंगळवारी एका गुन्हेगाराने पाेलिसांवर गोळीबार केला. त्यापूर्वीही सलग तीन दिवस (१७ ते १९) शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. शहराबाहेरून येणाऱ्या गावठी कट्ट्यांना पाेलिस ‘चाप’ लावणार कसा, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. एकीकडे लाेकसभा निवडणुकीची धामधूम, दुसरीकडे गोळीबाराची मालिका असे चित्र असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गावठी कट्टा म्हणजे काय?

गावठी कट्टा म्हणजे पिस्तूल, बंदूक, तमंचा या शस्त्रांसारखेच एक शस्त्र आहे. ‘गावठी कट्टा’ हे पिस्तूल म्हणून गुन्हेगारी जगात सर्वाधिक वापरले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते खूप स्वस्त असते आणि गुन्हेगारांना अवैध पद्धतीने अगदी सहज उपलब्ध होते. हा कट्टा बनवण्यासाठी ४ हजारांचा खर्च येतो. बनावटीनुसार, तो १० हजार ते २५ हजार यादरम्यान विकला जातो.

शहरात कुठून येतो गावठी कट्टा?

पुण्यात किरकोळ कारणावरून गावठी कट्ट्याने फायरिंग केले जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या गोळीबारात एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. शहरात प्रामुख्याने मध्य प्रदेश येथून कुरिअर, ट्रॅव्हल्स आणि रेल्वेने गावठी कट्टे आणले जातात. त्यातही मध्य प्रदेशातील उमरठी भागातून हे कट्टे माेठ्या प्रमाणात येत असल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले होते. उमरठी गावात कट्टे बनवून एका साखळीमार्फत ते राज्यभर विक्रीसाठी येतात. हे गावठी कट्टे विकण्याच्या साखळीत बेरोजगार तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुरवठ्याचे केंद्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अन् बिहार

मध्य प्रदेशातून देशभर कट्टे पोहोचवले जातात. उत्तर प्रदेश येथील बऱ्हानपूर आणि बिहार येथील लोहारकाम करणारे काही लोक गावठी कट्टे बनवतात. पकडले जाऊ नये म्हणून बॅरल आणि मॅक्झिन वेगवेगळ्या ठिकाणी बनवतात. या राज्याची सीमा ओलांडून तसेच जंगल व डोंगराळ प्रदेश पार करून ‘शस्त्रतस्कर’ गावठी कट्टे खरेदी करून विक्रीसाठी खासगी माेटारीने राज्यात आणत असल्याचे यापूर्वी पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. देशातील बहुतांश गुन्हेगारी घटना या गावठी कट्ट्यांच्या साहाय्याने पार पाडल्या जातात. त्यामुळे आजघडीला ‘गावठी कट्टे’ हा शहरासह राज्यासाठीदेखील चिंतेचा विषय बनलेला आहे.

चार वर्षात ३८० आरोपींना अटक..

पुणे पोलिसांनी २०२० ते २०२३ या चार वर्षांच्या कालावधीत आर्म ॲक्ट अंतर्गत २८४ केसेसमध्ये ३८० आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून ३४० शस्त्रे जप्त करण्यात आली होती, तर २ हजार १५६ काडतुसे जप्त करण्यात आली होती.

वर्षानुसार आकडेवारी -

वर्ष - दाखल केसेस - जप्त हत्यार - जप्त काडतूस - अटक आरोपी

२०२० - ८४ - ११६ - २२० - १०२

२०२१ - ६७ - ७५ - ५०६ - ८८

२०२२ - ७० - ८२ - १२९८ - ९३

२०२३ - ६३ - ६७ - १३२ - ९७

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी