शेगडी जमिनीवर ठेवून स्वयंपाक करणे घातक  : कविता टिक्कू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:47 PM2019-11-06T13:47:24+5:302019-11-06T13:49:44+5:30

शेगडी गॅस सिलिंडरच्या उंचीपेक्षा थोडी वर हवी

the gas stove putting on the ground and cooking is very dangerous: KavitaTikku | शेगडी जमिनीवर ठेवून स्वयंपाक करणे घातक  : कविता टिक्कू 

शेगडी जमिनीवर ठेवून स्वयंपाक करणे घातक  : कविता टिक्कू 

googlenewsNext

पुणे : शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी जमिनीवर गॅस शेगडी ठेवून स्वयंपाक करण्याची पद्धत सर्रास वापरली जाते. तसेच, गॅस संपल्यानंतर सिलिंडर गरम पाण्यात ठेवणे अथवा सिलिंडर आडवा करूनही वापरला जातो. मात्र, या गोष्टी अपघाताला निमंत्रण ठरू शकतात. त्या टाळाव्यात, असे आवाहन इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या उप महाव्यवस्थापक कविता टिक्कू यांनी केले आहे. 
गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापरासाठी ऑईल कंपन्यांच्या वतीने देशभर सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. गॅस सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी गॅसचे वजन आणि गॅसमधून गळती होते की नाही, हेदेखील तपासण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. यापुढे गॅस वितरण कर्मचाऱ्यासोबत गॅसचे वजन दर्शविण्याचा काटा आणि गळती शोधण्याचे उपकरणदेखील असेल. त्याबाबत ऑईल कंपन्यांनी जागृती मोहीम हाती घेतली आहे. 
याबाबत माहिती देताना टिक्कू म्हणाल्या, ‘‘एलपीजी गॅस हा स्वयंपाकासाठी अत्यंत उपयुक्त असला, तरी तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेची काळजी गॅस सिलिंडर स्वीकारण्यापूर्वीच केली पाहिजे. सिलिंडरच्या वजनापासून ते गळतीबाबतची माहिती जाणून घेणे ग्राहकाचा अधिकार आहे. तसेच, गॅसचा वापर करतानादेखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. गॅस शेगडी ही गॅस सलिंडरच्या उंचीपेक्षा वर असली पाहिजे.’’
किचन ओट्याखाली गॅस ठेवल्यास तो, फर्निचरने झाकून बंदिस्त करू नये. अनेकदा गॅस शेगडी खाली ठेवून स्वयंपाक केला जातो. अशी पद्धत अत्यंत घातक आहे. 
एलपीजी गॅस हवेपेक्षा जड असतो. गॅस शेगडी सिलिंडरच्या उंचीपेक्षा खाली असल्यास गॅसचा एकसमान पुरवठा होत नाही. त्यामुळे अपघात संभवू शकतो. त्यामुळे फरशीवर स्वयंपाक करणे टाळावे. जेथे स्वयंपाक ओटा नसेल त्यांनी तशा पद्धतीने ओटा करून घेतला पाहिजे. तसेच, अनेकदा गॅस संपल्यानंतर गरम पाण्यत गॅस सिलिंडर ठेवून त्याचा वापर केला जातो अथवा सिलिंडर तिरका किंवा आडवा करून वापरणेदेखील घातकच असल्याचे टिक्कू यांनी स्पष्ट केले.
.........
तुम्हाला हे माहिती आहे काय ?
स्वयंपाकाच्या गॅसचे वजन १४.२ किलो आणि रिकाम्या गॅस सिलिंडरचे वजन १५.५ किलोंदरम्यान असते. साधारण भरलेल्या सिलिंडरचे वजन २९.७ किलोग्रॅम भरले पाहिजे. यात शंभर ग्रॅमपर्यंत वजन कमी-अधिक असल्यास सामान्य मानले जाते
एलपीजीमधे मकॅप्टन या द्रवपदार्थाचे काहीसे मिश्रण असते. या द्रवाला दुर्गंधी असल्यानेच गॅस गळती झाल्यावर ती लक्षात येते.
एलपीजी गॅसचा एक लिक्विड थेंब अडीचशे पट प्रसरण पावतो. म्हणजेच एक थेंब घरात सांडल्यास तो अडीचशे थेंबांच्या आकाराचा गॅसव्हेपर तयार करू शकतो.
..........

Web Title: the gas stove putting on the ground and cooking is very dangerous: KavitaTikku

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.