शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जखमी, कोणतीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:56 IST

सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

आळंदी : आळंदी देवाची येथे दत्त मंदिर रस्त्यावरील हरिपाठ उद्यान समोर सोमवारी (दि. २८) पहाटे साडेपाचच्या सुमारास एका घराला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.            आळंदीतील लहु विठ्ठल कोकाटे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया यांनी आळंदी अग्निशमन दलास दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहन तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे वाहन पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. तरीही जवानांनी धाडसाने घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरू केले. घरातून दोन एलपीजी सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्याने संभाव्य मोठा स्फोट टळला. दरम्यान आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.                नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दलातील लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, सिद्धार्थ गावडे, साहिल काळे, वाहनचालक विनायक सोळंकी आदींनी मोठ्या मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी आळंदी पोलीस ठाण्याचे गोपनीय अधिकारी मच्छिंद्र शेंडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मदत कार्यात हातभार लावला.  

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीSenior Citizenज्येष्ठ नागरिकhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCylinderगॅस सिलेंडर