शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

सत्यनारायण पूजेवरून गोंधळ सुरूच ! गरवारे महाविद्यालयाची पूजा स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 18:04 IST

महाविद्यालयात सत्यनारायण पूजा करणे योग्य की अयोग्य यावरून सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून गरवारे महाविद्यालयाने ५ सप्टेंबर रोजी आयोजित पूजा स्थगित केली आहे. 

पुणेमहाविद्यालयात सत्यनारायण पूजा करणे योग्य की अयोग्य यावरून सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून गरवारे महाविद्यालयाने ५ सप्टेंबर रोजी आयोजित पूजा स्थगित केली आहे. 

    राज्यशासनाने सरकारी कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विधी करण्यास पूर्णत: मनाई केली आहे. जून २०१७ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकामध्ये सर्व शासकीय संस्थांमधील देव-देवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. शुक्रवार (दि.२४) रोजी शहरातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यशासनाने सरकारी कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विधी करण्यास पूर्णत: मनाई केली आहे. जून २०१७ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकामध्ये सर्व शासकीय संस्थांमधील देव-देवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या पूजेला विद्यार्थी संघटनेने विरोध करत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला उत्तर म्हणून आज (दि.२८) रोजी फर्ग्युसन प्रशासनाला पाठिंबा देण्यासाठी पतित पावन संघटनेने महाविद्यालयाच्या दारावर पूजा घातली. मात्र हा वाद इथेच संपला नाही. येत्या बुधवारी आयोजित करण्यात आलेली आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पूजाही विद्यार्थी संघटनेच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आली आहे.

       याबाबत प्राचार्य मुक्तजा मठकरी यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र गरवारे महाविद्यालयाने ही पूजा महाविद्यालय प्रशासन नव्हे तर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.परंतु शासकीय परिपत्रक असताना महाविद्यालयात पूजा घालण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला. अखेर हे सर्व लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनातर्फे जाहीर सूचना काढून सत्यनारायण स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत संस्थेच्या नियामक मंडळाशी बोलणे सुरु असल्याचेही यात सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी