शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:00 IST

मंडई परिसरातील भाड्याच्या ८ बाय १० च्या पत्र्याच्या खोलीत आयुष्याची सुरूवात..

ठळक मुद्देहेमंत रासने यांचा प्रवासशिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वच उपक्रमांतून आजपर्यंत कार्यरत

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक उत्साही गणेशभक्त कार्यकर्ता म्हणून नावलौकिक असलेल्या, हेमंत रासने यांची आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली़. गरीब कुटुंबात जन्माला आलेले व मंडई परिसरातील भाड्याच्या ८ बाय १० च्या पत्र्याच्या खोलीत आयुष्याची सुरूवात करणाऱ्या रासने यांनी, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच १९८६ साली विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणून कामास प्रारंभ केला़.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून मिळालेली शिस्त 'संघटन मै शक्ती है' या सुत्रांतून शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आशा सर्वच उपक्रमांतून मित्रमंडळींना सोबत घेऊन ते आजपर्यंत कार्यरत राहिले़. सुवर्णयुग बँकेत कार्यरत असताना लेखनिक हुद्यावरून सुरवात करत रासने यांनी ७ वर्षे संचालक म्हणून तर २ वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. सन २००२ मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली. तर २०१२ आणि २०१७ साली पालिकेकरिता उमेदवारीही दिली. २०१७ च्या निवडणुकीत पुणे शहरात पुरूष नगरसेवकांमध्ये शहरात सर्वात जास्त मते मिळविण्याचा बहुमान रासने यांना मिळाला. या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यांची सन २़०१४ साली विश्वस्तपदी निवड केली. पुणे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत असताना प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा उपलब्ध करून देणे, पुण्याचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे सुशोभीकरण व तो मूळ स्वरूपात ७ मजली पुनर्बांधणी करावा यासाठी पुरातत्व विभागाशी पाठपुरावा करणे, २०५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणे, ऐतिहासिक नानावडाचे सुशोभीकरण करणे तसेच शहरातील वाहनचालकांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मध्यवर्ती भागातील ७ सिग्नलवर एकूण २० ठिकाणी ग्रीन नेट असे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे़ तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील पथारीवाल्याचे प्रश्न, जुन्या वाड्यांचा प्रश्न, कचरा नियोजन आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे़ सर्वसामान्य गणेशोत्सव कार्यकर्ता आज पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष होतोय, याचा पुणे शहरातील प्रत्येक गणपती मंडळ कार्यकर्त्यांला अभिमान असल्याचा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत़

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका