शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड कुटुंबाची मासिक उलाढाल १०० कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:11 IST

पुणे : नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार ऊर्फ गणेश गायकवाड यांच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मकोका कायद्यानुसार ...

पुणे : नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार ऊर्फ गणेश गायकवाड यांच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मकोका कायद्यानुसार कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याच कुटुंबातील दीपा गायकवाड ऊर्फ पवार हिला अटक झाल्यामुळे आता गायकवाड सदस्यांमधील आरोपींची संख्या नऊवर गेली आहे. गायकवाडसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व वैध-अवैध पद्धतीने करण्यात आलेली मासिक उलढाल ही १०० कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच झडती घेतली. त्यात पोलिसांना काही मुद्देमाल सापडला आहे. मात्र अद्याप काही कागदपत्रे, लोकांकडून जबरदस्तीने लिहून घेतलेले दस्तावेज, बेहिशोबी मालमत्ता, रोख रकमा या आरोपींनी नियोजनबद्धरित्या कट रचून अनोळखी ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत. हे सर्व दस्ताऐवज लपविण्यामध्ये दीपा गायकवाड हिचा मुख्य सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली असून, तिला पोलीस कोठडी मिळाली आहे.

यापूर्वी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा. एनएसजी हाऊस, औंध) यांना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उद्या (दि.३) त्याची मुदत संपत आहे.

गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून, उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर इलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाइल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरूमध्ये पैसे मोजण्याची एक मशिन मिळून आल्याचे सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मूळ फिर्यादीतर्फे पुष्कर दुर्गे, सचिन झालटे, हृषीकेश धुमाळ कामकाज पाहत आहे. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.