शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'भावी खासदार सुनेत्रा पवार...! बारामतीत फ्लेक्सवर शाई फेकण्याचा खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:15 IST

''भावी खासदार सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा'' या आशयाचा फ्लेक्स त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता

सुपे (बारामती) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार म्हणुन लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शाई फेकण्याचा प्रकार अज्ञात व्यक्तीने केला असल्याची घटना बारामती तालुक्यातील काऱ्हाटीपाटी नजीक रविवारी (  दि. ११ ) घडली. दरम्यान शाई फेकल्याचे लक्षात येताच पोलिसांच्यावतीने फ्लेक्स उतरवण्यात आला आहे. 

 काऱ्हाटी पाटी येथे एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर भावी खासदार असा उल्लेख केलेला होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन फलकावर शाई फेकल्याचे आज ( रविवारी ) सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवारी ( दि. ६ ) संध्याकाळी निवडणुक आयोगाने दिले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचे सातत्याने भाषणातुन जाहिर करीत आहेत. पवार यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे काऱ्हाटी पाटी येथे तो संबंधित फ्लेक्स लावण्यात आला होता. त्या फ्लेक्सवर सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा. या आशयाचा फ्लेक्स त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे. मात्र या फ्लेक्सवर अज्ञातांनी शाई फेक केल्याचा प्रकार घडला आहे.  दरम्यान सुपे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी जावुन फ्लेक्स उतरवला आणि ताब्यात घेतला आहे. यावेळी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल गेला असुन अधिक तपास सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा