अंत्यविधीचा निधीही हडप
By Admin | Updated: November 29, 2014 00:04 IST2014-11-29T00:04:36+5:302014-11-29T00:04:36+5:30
शहरात गरीब व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू केंद्रातून दिले जाणारे अनुदानही लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला.

अंत्यविधीचा निधीही हडप
सुनील राऊत ल्ल पुणो
शहरात गरीब व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू केंद्रातून दिले जाणारे अनुदानही लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. निधी लाभाथ्र्यांर्पयत पोहोचविणो, हे सबंधित अधिका:यांचे आद्य कर्तव्य असते. मात्र, पालिकेतील कावळे याकडे काणाडोळा करीत स्वत:च अंत्यविधीचा निधी हडप करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अंत्यविधीचे अनुदान 25क् रुपयांचे आहे. मात्र, त्याची माहितीच नसल्याने जन्म-मृत्यू केंद्रात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांकडून अनुदानाच्या अर्जावर बिनदक्कत सह्या घेऊन हा निधी लाटला जात असल्याच्या तक्रारीही आहेत.
पालिकेच्या 1995च्या ठरावानुसार आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्ती मरण पावल्यास व्यक्तींच्या नातेवाइकांना तिचे दहन करायचे असेल तर 25क् रुपये, दफन करायचे असल्यास 15क् रुपये आणि विद्युत दहन करायचे असल्यास 6क् रुपये अनुदान दिले जाते. संबंधित व्यक्तीने आपल्या प्रभागातील नगरसेवकाचे शिफारसपत्र व अनुदानासाठीचा अर्ज दिल्यानंतर अनुदान दिले जाते.
हडपसर-माळवाडी परिसरात राहणारे नाना थोरात यांचा मृत्यू जुलै 2क्क्7मध्ये झाला होता. थोरात यांचा मुलगा चैतन्य थोरात यांचा मित्र तुषार धायगुडे यांनी कोणी अनुदान घेतले आहे का, याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज केला. ही माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाकडून टाळाटाळ करण्यात आली. तुषार यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केले. त्यानंतर जन्म-मृत्यू केंद्राकडून देण्यात आलेली माहिती धक्कादायक होती. यात नाना थोरात यांच्या मुलाला 25क् रुपयांचे अनुदान देण्यात आले असून त्यांची स्वाक्षरी करण्यात आलेली होती. याबाबत चैतन्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, वडिलांच्या निधनावेळी लहान होतो; त्यामुळे अनुदानाबाबत काहीच माहीत नव्हते. मात्र, पैसे घेतल्याचे पाहून धक्का बसल्याचे सांगितले.
थोरात यांच्याप्रमाणोच या अनुदानाचा विदारक अनुभव येरवड येथील 75 वर्षीय सिद्धराम कांबळे यांनाही आला आहे. कांबळे यांचा मुलगा संतोष कांबळे याचा 2क्12मध्ये मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी जवळपास 2 हजार रुपये खर्च आला; पण जेव्हा ते मुलाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जन्म-मृत्यू विभागात गेले, तेव्हा त्यांची 25क् रुपये अनुदानाच्या मस्टरवर सही घेतली गेली. त्यांनी पैशांबाबत विचारले असता दोन दिवसांनंतर या, असे सांगण्यात आले. अशा पद्धतीने सिद्धराम कांबळे यांनी तब्बल चार वेळा चकरा मारल्या तेव्हा कुठे वैतागून कर्मचा:यांनी त्यांच्या हातावर शंभर रुपये टेकवण्यात आले.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील व्यक्तींच्या नातेवाइकांना महापालिकेच्या 1995च्या ठरावानुसार, व्यक्ती मृत झाल्यास तिचे दहन करायचे असेल तर 25क् रुपये, दफन करायचे असल्यास 15क् रुपये आणि विद्युत दहन करायचे असल्यास 6क् रुपये अनुदान दिले जाते.
वर्ष दहन विद्युत दाहिनी दफन
2क्क्821क्33
2क्क्92क्372
2क्1क्166क्क्
2क्11851क्
2क्125क्11
2क्135111
या प्रकाराबाबत आरोग्य विभागाकडे संबधितांनी तक्रार केल्यानंतर अनुदान देण्याच्या पद्धतीत बदल केला गेला आहे. यापूर्वी कोणतेही पुरावे न घेता, तसेच शहानिशा न करता, हे अनुदान देण्यात येत होते. ही जबाबदारी कसबा-विश्रमबागवाडा येथील जन्म-मृत्यू केंद्राकडे होती. आता त्यात बदल करण्यात आला आहे. अनुदान देताना संपर्क क्रमांक, तसेच फोटो ओळखपत्रचा पुरावा घेण्यात येतो. तसेच, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी लवकरच त्याचे संगणकीकरणही कररण्यात येणार आहे.
- डॉ. एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्यप्रमुख