शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'उपमुख्यमंत्र्यांचा शब्द'; कोरोना प्रतिबंधासाठी निधी कमी पडू देणार नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 18:46 IST

एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तात्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्ण, शहरातील बाधित क्षेत्र, याबाबतची अद्ययावत माहिती संकलन व विश्लेषण

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटीने महापालिकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या वॉर रूम (डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेऊन पुढील नियोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचेही सांगितले.वॉर रूममधील संगणकीय प्रणालीव्दारे, कोरोनाबाधित रुग्ण, शहरातील बाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याबाबतची अद्ययावत माहिती संकलन व विश्लेषण मांडले गेले आहे. त्यामुळे पुढील उपाययोजना करणे सोपे असून, अगदी सुरुवातीपासूनची माहिती या ठिकाणी मिळू शकते, अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड तसेच अतिरिक्त मनपा आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी यावेळी दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त मनपा आयुक्त  शंतनू गोयल, आरोग्यप्रमुख डॉ़ रामचंद्र हंकारे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, रुग्ण वाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करावा तो लगेच उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. पुणे स्मार्ट सिटीने विकसित केलेली ही संगणकीय प्रणाली उत्तम असल्याचे सांगून त्यांनी, एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तात्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली. तर भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य ठिकाणीही कोविड सेंटर कार्यान्वित करावेत अशी सूचना केली.यावेळी पवार यांनी, पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली काय याची विचारणा केली असता, मनपा आयुक्त गायकवाड यांनी, पुन्हा संबंधित रूग्णाला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगून, महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगून रोज अन्य चार ते साडेचार हजार लोकांना फोन करून माहिती घेतली जात असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारMayorमहापौरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस