शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलना’च्या माध्यमातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:47 PM

यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सी. एस. आर. असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. संमेलन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्देपुण्यामध्ये २८ जानेवारी रोजी आयोजित केले आहे यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनसाहित्य संमेलनातून राबविला जात आहे सी. एस. आर. असा हा एक आगळावेगळा उपक्रम

पुणे : एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लेखक, कवी व निमंत्रित यांचे मानधन, पंचतारांकित सुविधा व जाण्या-येण्याचा खर्च याची खमंग चर्चा होत असताना एका साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मात्र गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ असे त्याचे नाव आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सी. एस. आर. असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय साधणारे विविध उपक्रम यावर चर्चा, परिसंवाद अनुभवकथन असे याचे स्वरूप आहे.   या संमेलनाचे उद्घाटन मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पुणे हे करणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गिरिप्रेमी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे, काशी पंचक्रोशी परिक्रमा संघाचे अध्यक्ष पंडित विश्वनाथशास्त्री पाळंदे, भारती ठाकूर, उष:प्रभा पागे, श्रीहरेकाका, ब्रह्मा रेड्डी, पिंपरी चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, रवींद्र गुर्जर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   भारती ठाकूर या सुप्रसिद्ध लेखिकेने मंडलेश्वरजवळ लेपा गावामध्ये ‘नर्मदालय’ ही निवासी शाळा आणि कौशल्य शिक्षण प्रदान करणारे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. साहित्य संमेलनातून सी. एस. आर. असा  हा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनामधून सामाजिक उपक्रमासाठी भरघोस निधी दिला जाणार आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे