सात वर्षे फरार गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:21+5:302021-02-05T05:14:21+5:30
पुणे : घरावर गोळीबार करुन दहशत माजवून गेली ७ वर्षे फरार असलेल्या पप्पु तावरे टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट ...

सात वर्षे फरार गुन्हेगार जेरबंद
पुणे : घरावर गोळीबार करुन दहशत माजवून गेली ७ वर्षे फरार असलेल्या पप्पु तावरे टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली. सोपान नारायण तावरे (वय ४०, रा. जांभळी, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे.
पप्पु तावरे टोळीतील सदस्यांनी तुकाराम पासलकर यांच्या घरावर गोळीबार करुन काेयते मारुन वडगाव बुद्रुक येथे ७ मे २०१४ रोजी दहशत माजविली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी किरण रानवडे, श्रीरंग थोपटे, मंगेश दिघे यांना अटक केली होती. तेव्हापासून सोपान तावरे फरार होता. पोलीस अंमलदार विल्सन डिसोझा यांना सोपान तावरे हा बागुल उद्यानासमोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोपान तावरे याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.