नाट्य परिषदेसाठी मोर्चेबांधणी; परिषदेच्या पुणे शाखेच्या पदाधिका-यांचे ‘नाटकवाले’ पँनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 04:56 AM2018-01-21T04:56:48+5:302018-01-21T04:56:55+5:30

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पॅनल तयार केले आहे.

Frontline for the Natya Parishad; The panel 'playwright' panel of officials of the Pune branch of the Council | नाट्य परिषदेसाठी मोर्चेबांधणी; परिषदेच्या पुणे शाखेच्या पदाधिका-यांचे ‘नाटकवाले’ पँनल

नाट्य परिषदेसाठी मोर्चेबांधणी; परिषदेच्या पुणे शाखेच्या पदाधिका-यांचे ‘नाटकवाले’ पँनल

Next

पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पॅनल तयार केले आहे. पुण्यातच नाट्य परिषदेच्या दोन स्वतंत्र शाखा असल्याने परिषदेच्या कोथरूड शाखेच्या अध्यक्षांनी मात्र पुणे जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्याला नाट्य परिषद पुणे शाखेकडून प्रतिसाद मिळणार का? हा प्रश्न आहे.
नाट््य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. राज्यातील १९ जिल्ह्यांतून जवळपास १९३ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई (३८), मुंबई उपनगर (१७), ठाणे (५), लातूर (१), उस्मानाबाद (२), रत्नागिरी (५), कोल्हापूर (५), सांगली (१०), सोलापूर (१३), पुणे (२३), नाशिक (९), अहमदनगर (१३), जळगाव (५), नागपूर (१९), नांदेड (६), अकोला (५), वाशिम (९), बेळगाव (४) आणि बीड (३) या ठिकाणाहून उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये नाट्य परिषदेच्या विद्यमान शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांचाही समावेश आहे. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनीही अर्ज भरले आहेत. या दोघांसह योगेश सोमण, भाग्यश्री देसाई, विजय पटवर्धन, विनोद खेडकर, प्रमोद रणनवरे आणि प्रशांत कांबळे यांनी ‘नाटकवाले’ नावाचे पॅनल तयार केले आहे. कोथरूड शाखेकडून मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.
मागच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे नाट्य परिषदेकडून घटनेत दुरुस्ती करण्यात आली आहे. पूर्वी विभागवार निवडणुका घेतल्या जायच्या, त्यात पश्चिम महाराष्ट्रांतर्गत सांगली, सातारा, कºहाड, इचलकरंजी आणि पुण्याचा समावेश होता. मात्र आता नवीन घटनेनुसार ३00 शाखांचे सभासद असतील, त्यातला एक प्रतिनिधी परिषदेच्या नियामक मंडळावर घेतला जाणार आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यासाठी सात जागा आहेत. त्यात पुणे, बारामती, तळेगाव, पिंपरी चिंचवड, कोथरूड आणि दौंड या सात शाखांचा समावेश आहे. राज्यात एकूण २३, ४५0 मतदार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी २२ जानेवारीला जाहीर होईल.

मतदान केंद्रावरच जाऊन मतदान करावे लागणार
नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार आता मतदारांना बॅलेट पत्रिकेद्वारे मतदान न करता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. जिल्ह्यातील शाखांच्या सदस्यांसाठी मतदान केंद्राचे ठिकाण संबंधित शाखेत तसेच नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर दि. ३१ जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहे. दि. ४ मार्च रोजी मतदानप्रक्रिया राबविली जाणार असून, दि. ७ मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली.

परिषदेचे काम काय?
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी ‘नाटकवाले’ या पॅनलच्या माध्यमातून परिषदेचे नक्की काम काय आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील नाट्य संकुल चालवणे एवढेच परिषदेचे कार्य आहे का? मुंबई सोडून महाराष्ट्रभर पसरलेल्या परिषदेच्या शाखा आणि त्यातील आजीव सदस्यांसाठी परिषद काय करते याचा विचार करण्याची गरज आहे. या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांनी नाट्य परिषदेच्या कार्याचा मूळ ढाचाच बदलावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा आहे. उगाच खर्च कशाला करायचा? आमच्या काही लोकांनी अर्ज भरले आहेत. मात्र पॅनल वगैरे अजूनतरी केलेले नाही. अर्जांची छाननी झाल्यानंतर पाहू.
- सुनील महाजन,
अध्यक्ष कोथरूड नाट्य परिषद

Web Title: Frontline for the Natya Parishad; The panel 'playwright' panel of officials of the Pune branch of the Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे