शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By नितीश गोवंडे | Updated: May 3, 2024 16:15 IST

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिसांनी एका इसमावर बलात्कार व अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे....

पुणे : सोशल मीडियावर मैत्री करुन तरुणीला प्रपोज केले. दोन वर्षे तिच्यासोबत रिलेशनमध्ये राहून तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करुन लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिसांनी एका इसमावर बलात्कार व अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ३१ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शिवराज सुभाषराव उंबरकर (रा. देवगाव, अंजनगाव, अमरावती) याच्यावर बलात्कारासह अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत चंदननगर आणि पीडित तरुणीच्या रूममध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची एप्रिल २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने मुलीसोबत मैत्री करुन प्रेमसंबंध निर्माण केले. शिवराज याने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दोघेजण रिलेशनमध्ये राहू लागले. रिलेशनमध्ये असताना आरोपीने तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडितेने शिवराज याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली, असता त्याने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात जात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शिवराज उंबरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तापस सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख या करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी