शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केला खून

By admin | Updated: June 27, 2015 03:35 IST

अनैतिक संबंधातून मित्राने मारहाण केल्याचा राग मनात धरून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना १ महिन्यानंतर नारायणगाव पोलिसांनी उघडकीस आणली़

नारायणगाव : अनैतिक संबंधातून मित्राने मारहाण केल्याचा राग मनात धरून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना १ महिन्यानंतर नारायणगाव पोलिसांनी उघडकीस आणली़ ही घटना येडगाव (कैलासनगर) येथे घडली़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात यांनी दिली़या घटनेत येडगाव (कैलासनगर) येथील मेंढपाळ लक्ष्मण तुळशिराम कारंडे (वय ४५, मूळगाव साकूर मांडवा, दरेवाडी, ता़ संगमनेर जि़ अहमदनगर, सध्या रा़ येडगाव, गणेशनगर) यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले़ तर पिराजी भाऊ कारंडे (वय ४७, रा़ साकुर मांडवा (दरेवाडी) ता़ संगमनेर जि़ अहमदनगर ) याने त्याचे साथीदार राहूल भिमाजी औटी (वय २३, रा़ साळवाडी, ज़ुन्नर) , समीर अशोक कोल्हे (वय २१, रा़ कोल्हेमळा नारायणगाव) यांचे मदतीने लक्ष्मण यांचा गळा दाबून केल्याचे उघडकीस आले़ यातील पिराजी कारंडे हा मुख्य आरोपी असून तो फरार आहे़ तसेच राहुल भिमाजी औटी व समीर अशोक कोल्हे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत़ ११ जून रोजी पिराजी कारंडे याने राहुल औटी, समीर कोल्हे व लक्ष्मण याचा मित्र अंकुश औटी यांच्या मदतीने लक्ष्मण तुळशिराम करांडे याचा डिंभा कालव्याच्या जवळ गळादाबून खून करण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी लक्ष्मण हा बेशुध्द झाला. त्याला मांडवगण फराटा येथे नेत असताना लक्ष्मण याने थोडी हालचाल केली. त्यावेळी पिराजी कारंडे याने मफलरच्या साहयाने त्याचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह कुकडी नदीत फेकून दिला़ त्यानंतर दि़ १३ जून २०१५ रोजी कुकडी नदीच्या तिरावर मांडवगण फराटा परिसरातील एका शेतकऱ्याला हा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला़ त्यावेळी तेथील पोलिसांनी अकस्मित नोंद केली होती़ (वार्ताहर)