शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोच्या विद्युतीकरणाचे काम फ्रेंच कंपनीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 00:49 IST

चार टप्प्यांत होणार काम : २८ किलोमीटरचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार

पुणे : मेट्रो मार्गाच्या वाहतूक फेऱ्यांचे नियोजन करण्यापाठोपाठ या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे कामही फ्रान्सच्या अलस्टोम कंपनीला देण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. तब्बल १५ दशलक्ष युरोचे (सुमारे ११६ कोटी ३९ लाख रुपये) हे काम चार टप्प्यांत केले जाणार असून, २०२३ पर्यंत २८ किलोमीटर अंतराचे काम करण्याचे आव्हान कंपनीसमोर असेल.

पुणे मेट्रो लाइन १ व २ साठी ट्रॅक्शन इलेक्ट्रिफिकेशन आणि सेक्शनिंग पोस्टचे काम करण्याची जबाबदारी या कंपनीवर असेल. या मार्गावर २५ केव्हीच्या लवचिक आणि बळकट ओव्हरहेड कॅटेनरी यंत्रणा (ओसीएस/ओएचई) उभारणे, त्याची तपासणी करून यंत्रणा कार्यान्वित करून द्यावी लागेल. त्याचबरोबर पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी सेक्शनिंग पोस्टही बसवावे लागतील. या प्रकल्पाची अंमलबजावणी चार टप्प्यांत केली जाणार असून, २८ किलोमीटरच्या मार्गाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करावे लागेल, अशी अट करारात आहे.

अलस्टॉमला यापूर्वी, मुंबई मेट्रोचे २ ए, २ बी व ७ क्रमांकाचे मार्ग आणि पुणे मेट्रोचे १ व २ क्रमांकाचे मार्गांवर एकात्मिक वाहतूक योजना राबविण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यासाठी अर्बालिस ४०० हे अलस्टॉमचे अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.सीबीटीसीएस प्रणालीकम्युनिकेशन बेस ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसीएस) संपूर्ण स्वयंचलित प्रणाली आहे. दोन मेट्रो दरम्यानचा वेळ हा ७० सेकंद इतका असेल. या कालावधीत मेट्रो वाहतुकीचे संचलन करण्याचे किचकट काम ही प्रणाली पार पाडेल. तसेच, वीजवापरातही त्यामुळे ३० टक्के बचत होणार असल्याचा दावा अलस्टोम कंपनीने केला आहे.कॅटेनरी सिस्टीममुळे देखभाल खर्चात कपातविद्युतीकरणासाठी २५ केव्ही फ्लेक्सिबल अ‍ॅण्ड रिजिड ओव्हरहेड कॅटनरी सिस्टीममुळे उभारणी आणि देखभाल दुरुस्तीच्या खर्चात कपात होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे