शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची वाहतूक होणार ११० किमी ताशी वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 12:47 IST

मालगाडी बनली सुपरफास्ट

ठळक मुद्देअंबाला विभागात झाली वेगाची चाचणी, मुख्य संरक्षक आयुक्तांनी दिली मंजुरी

पुणे: आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची (वाहनाची) अति जलद म्हणजे ताशी ११० किमी वेगाने वाहतूक होणार आहे. नुकतेच अंबाला रेल्वे विभागात याच्या वेगाची चाचणी झाली. यावेळी गाडी ताशी १२० किमी वेगाने धावली. मुख्य संरक्षक आयुक्तांनी मात्र ताशी ११० किमी वेगाने गाडी धावण्यास मंजुरी दिली. लवकरच रेल्वे बोर्ड कडून देखील ह्याला मंजुरी मिळेल. मग भारतात माल वाहतूक देखील सुपरफास्ट गतीने होईल.

रेल्वे मंत्रालयने आयुर्मान संपलेले प्रवासी डबे भंगारात न घालता त्याचा वापर दुचाकी व चारचाकी वाहनाची वाहतूक करण्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. त्यानुसार एनएमजी ( न्यू मोडीफाय गुड्स ) डबे तयार करण्यात आले. आता यात आणखी बदल झाला असून एनएमजीएच डबे तयार करण्यात आले. देशात जवळपास २ हजार डबे तयार करण्यात आले. याद्वारे वाहनाची वाहतूक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त, जलद व सुरक्षित होत आहे. शिवाय यामुळे इंधनाची देखील बचत होत आहे.

कसे असतात एनएमजी कोच 

प्रवासी डब्यांतील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली. तसेच खिडक्या व दरवाजे बंद करण्यात आले. रेल्वे स्थानकावर देखील विशिष्ट प्रकारचे रॅम्प तयार करण्यात आला. एका डब्यातून १५ टन मालाची वाहतूक होते. पूर्वी त्याची क्षमता ९.२ टन इतकी होती. तसेच डब्यांत लाईटची व्यवस्था करण्यात आली. दरवाज्याच्या रचनेत बदल झाला आहे.

परळचा पॅटर्न देशभर चालणार 

रेल्वेच्या परळ कार्यशाळेत मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक विवेक आचार्य यांनी यावर आणखी काम केले असून हे डबे ११० किमी वेगाने धावण्यासाठी तयार केले आहेत. यावर्षी १०० डबे तयार केले जातील. परळ मध्ये तयार केलेल्या डब्या प्रमाणेच आता भोपाल, लखनऊ, अजमेर येथील कार्यशाळेत लवकरच अशा प्रकारचे डबे तयार केले जातील.  चारचाकी व दुचाकीची वाहतूक करण्यासाठी सुरुवातीला एनएमजी डबे तयार केले गेले. आता हे डबे वेगावन बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे देशांतर्गत वाहनाची वाहतूक वेगाने होईल. लवकरच ११० किमी वेगाने ह्या गाडया धावणार असल्याचे मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेPoliceपोलिस