लोणी स्टेशन परिसरातील नामांकित शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 21:33 IST2025-01-13T21:32:54+5:302025-01-13T21:33:50+5:30

  या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. तर काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात राहतात. तर काही विद्यार्थी संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्वावरील घेतलेल्या वस्तीगृहात राहतात.

Freestyle brawl between students of a renowned educational complex near Loni Station | लोणी स्टेशन परिसरातील नामांकित शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी

लोणी स्टेशन परिसरातील नामांकित शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी

लोणी काळभोर : लोणी स्टेशन परिसरातील एका मोठ्या नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन परिसरात असलेल्या इस्ट हेवन सोसायटीजवळ घडली आहे. विद्यार्थ्याकडून वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

  या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. तर काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात राहतात. तर काही विद्यार्थी संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्वावरील घेतलेल्या वस्तीगृहात राहतात. तर काही विद्यार्थी स्वतः फ्लॅट घेऊन मित्रांसोबत भाडेतत्वावर राहतात.या  परिसरातील होस्टेलमध्ये शेकडो विद्यार्थी राहतात. या ठिकाणी शाळा, बँक, हॉटेल व विविध दुकाने आहेत. या परिसरात क्रीओंन प्री प्रायमरी स्कूल देखील आहे. या स्कूलची शाळा दररोज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुटते.

मुलांना घरी नेण्यासाठी त्यांचे पालक येत असतात. सोमवारी (दि. १३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळा सुटली. तेव्हा शाळेच्या जवळ असलेल्या इस्ट हेवन सोसायटीसमोर विद्यार्थ्यांमध्ये दगडासह लाठी काठीने मारहाण सुरु झाली.या घटनेमुळे शाळेतील लहान विद्यार्थी व शिक्षक, पालक वर्ग घाबरून गेला होता.या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिक मागणी करीत आहेत.

Web Title: Freestyle brawl between students of a renowned educational complex near Loni Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे