Freedom of reject God due to Hindu religion : S.L. Bhayrappa | हिंदू धर्म देव नाकारण्याचे स्वातंत्र्य देतो; इतर धर्मांमध्ये ते नाही : एस. एल. भैैरप्पा

हिंदू धर्म देव नाकारण्याचे स्वातंत्र्य देतो; इतर धर्मांमध्ये ते नाही : एस. एल. भैैरप्पा

ठळक मुद्दे‘साक्षी’ आणि ‘उत्तरकांड’ या पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : धर्मशास्त्र रामायण आणि महाभारतावर आधारलेले आहे. देश सांस्कृतिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या एक आहे. तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याखेरीज मूल्याधिष्ठित मांडणी करता येणार नाही. हिंदुत्ववाद हा भारतीय तत्त्वज्ञानामुळे स्वीकारला गेला आहे. हिंदू धर्म मला देव नाकारण्याचे स्वातंत्र्य देतो. हे स्वातंत्र्य इतर धर्मांमध्ये नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. एस. एल. भैैरप्पा यांनी केले. मी कन्नड लेखक म्हणून नव्हे, भारतीय लेखक म्हणून स्वीकारला गेलो. साहित्य हृदयातून येत असल्याने ते मातृभाषेत लिहितो, असेही त्यांनी नमूद केले.
मेहता पब्लिशिंग हाऊस आणि कन्नड संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एस. एल. भैैरप्पा लिखित ‘साक्षी’ आणि ‘उत्तरकांड’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी डॉ. कलमाडी हायस्कूल येथे झाले. यावेळी लेखक डॉ. विश्वास पाटील आणि अनुवादक उमा कुलकर्णी उपस्थित होते. प्रा. रणधीर शिंदे यांनी पुस्तकांचा परिचय करून दिला. वाल्मीकी आणि व्यास यांनी पौराणिक कथांतून वास्तव समस्यांकडे लक्ष वेधले. वस्त्रहरण होत असताना द्रौैपदीच्या मनात कोणते विचार आले असतील, हे व्यास यांच्यासह कोणाच्याच ध्यानात आले नाही. मग कादंबरीलेखक म्हणून मी त्याकडे पाहायला नको का? मी महाभारत नष्ट केले नाही किंवा रद्दबातल ठरवले नाही. त्यातील जागा हेरून त्यावर प्रकाश टाकला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
भैरप्पा म्हणाले, ‘मी पुस्तकात जे प्रश्न मांडले, ते भारतातील सर्वांच्या जवळचे आहेत. मी भारतातील सर्व भागांत पर्यटन केले आहे. आपली गाव संस्कृती भारतात सर्वत्र एकच आहे. आपण आपल्या पौराणिक कथांना धरून आपली संस्कृती निर्माण करतो. मी माझ्या कादंबºया वास्तववादी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. युरोपातील कादंबरी हा प्रकार ४०० वर्षांपूवीचा आहे. टॉलस्टॉय यांच्या कादंबरी निसर्गकेंद्रित होत्या, ज्या वास्तवावर आधारित होत्या. पाश्चिमात्य लेखकांच्या कादंबºया वास्तववादाकडे झुकणाºया असूनही कंटाळवाण्या आहेत. तरीही कादंबरी ही वास्तववादीच असली पाहिजे, या मताचा मी आहे. कादंबरी म्हणजे मनोरंजन नाही. मूल्यांवर मांडणी करायची असते. त्यात निष्कर्षांपर्यंत पोहोचायचे नसते.’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांवर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. अनेक मराठी लेखकांना अडवले जात आहे. कर्नाटकमधील काही राजकीय नेत्यांनी धमकीची भाषा वापरली आहे. या घडामोडींबाबत भैरप्पा यांना विचारले असता, पोलिसांनी त्यांच्या कामाचा भाग म्हणून लेखकांना अडवल्याची कृती केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मराठी-कानडी हे आपले सहजीवन आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अनेक लोक द्वैभाषिक आहेत. तेलंगणा सीमेवरच्या लोकांनाही दोन भाषा येतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
...........
‘शिवराम कारंथ यांचा अनुवाद करत असताना, भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’ या कादंबरीशी परिचय झाला. भैरप्पा यांच्याशी संवाद साधत प्रत्येक प्रश्न जाणून घेतले. भैरप्पा हे आजचे भारतीय लेखक आहेत. त्यांना भारतभर लोक वाचतात; ते कुठल्याही पुरस्काराचे मिंधे नाहीत. आताचे युग हे अनुवाद युग आहे. वाचक स्वानुभवासाठी अनुवादित पुस्तक वाचत आहेत. भैरप्पा यांच्या वाङ्मयीन आकृतिबंधामध्ये, विचारप्रक्रियेत आणि लेखनशैलीत काही फरक झाला आहे का, याचा समीक्षकांनी अभ्यास केला पाहिजे.    -उमा कुलकर्णी 
..........
‘भारतीय स्तरावर जाण्याचे भाग्य ज्या लेखकांना लाभले, त्यात भैरप्पा यांचा समावेश आहे. भारतीय कादंबरी हा देशी की पाश्चात्य प्रकार आहे, असे म्हटले जाते. पण कादंबरी ही ‘देशी’च आहे. 
कादंबरी हा कौशल्याचा भाग आहे. भैरप्पा यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही, कारण कर्नाटकातील लोक राजकारणात अधिक असतात. साहित्यात देखील राजकारण असते. महाराष्ट्रात जेवढा ब्राह्मणद्वेष नाही, तेवढा कर्नाटकात आहे.’ -विश्वास पाटील 

Web Title: Freedom of reject God due to Hindu religion : S.L. Bhayrappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.