शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

‘सनबर्न’चा मार्ग मोकळा; अटी-शर्तींचे पालन करण्याचा उच्च न्यायालयाचा आयोजकांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:31 PM

सनबर्न या संगीत कार्यक्रमामध्ये दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

ठळक मुद्दे‘सनबर्न’ला राज्य सरकारकडून अद्यापही आवश्यक परवानगी नाहीसनबर्न फेस्टिव्हलला कोणत्याही स्वरूपाची अनुमती देऊ नये : हिंदू जनजागृती समिती

पुणे : सनबर्न या संगीत कार्यक्रमामध्ये दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली; मात्र किशोरवयीन मुला-मुलींना मद्यपान करू न देण्याचा व शासनाने घातलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ‘सनबर्न’चे आयोजक परसेप्ट लाइव्ह प्रा. लि. ला दिला आहे.२१ वर्षांखालील मुला-मुलींना मद्यपान करण्याची परवानगी देणार नाही, असे आश्वासन आयोजकांनी दिल्यानंतर न्या. शंतनू केमकर व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने ‘सनबर्न’ला हिरवा कंदील दाखवला; मात्र अद्यापही ‘सनबर्न’ला राज्य सरकारकडून आवश्यक परवानगी मिळालेली नाही.

‘सनबर्न’ला राज्य सरकारच्या पायघड्या का?युवा पिढीला व्यसनाधीन बनवणाऱ्या आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या, महसूल बुडव्या सनबर्न फेस्टिव्हलला राज्य सरकारच्या पायघड्या का, असा सवाल हिंदू जनजागृती समितीने केला. लवळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात ठराव केले आहेत. सनबर्न फेस्टिव्हलला होणारा विरोध लक्षात घेऊन सरकारने गेल्या वर्षी केलेल्या सर्व नियमभंगांविषयी आयोजकांवर कठोर आणि तत्काळ कारवाई करावी आणि लवळे येथे होऊ घातलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला कोणत्याही स्वरूपाची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, भाजपाचे नगरसेवक किरण दगडे, बावधनच्या सरपंच पियुषा दगडे पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलPuneपुणेHigh Courtउच्च न्यायालय