शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली २३ लाखांना गंडा; २५ लाखांची लॉटरी लागल्याचा केला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 17:24 IST

कौन बनेगा करोडपतीमध्ये आपला नंबर लागला असून त्यात तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले..

ठळक मुद्देचोरटे दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना मोहात पाडून पैसे भरायला पाडत होते भाग

पुणे : ‘कौन बनेगा करोडपती’ या वाहिनीवरील कार्यक्रमाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे घेऊ लागले आहेत. २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा बहाणा करुन चोरट्याने एका महिलेला तब्बल २३ लाख ४१ हजार २०५ रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले. याप्रकरणी हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या ३९ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी महिलेला २० ऑगस्ट रोजी एक मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगणाऱ्या एकाचा फोन आला होता. त्याने कौन बनेगा करोडपतीमध्ये आपला नंबर लागला असून त्यात तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. हे बक्षीस देण्यासाठी तुम्हाला टॅक्स, इन्शुरन्स यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले.  २५ लाख रुपये मिळणार म्हटल्यावर या महिलेने सर्व सारासार विचार करणे सोडून दिले़. सायबर चोरट्यांनी़ त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रमाणपत्र, लॉटरी तिकीट इत्यादी माहिती पाठविली. त्यावर या महिलेने विश्वास ठेवून ते सांगितले. त्यानुसार त्या बँक खात्यात पैसे भरु लागल्या.

चोरटे दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना मोहात पाडून पैसे भरायला भाग पाडत होते.अशा प्रकारे त्यांनी २५ लाखांची लॉटरी मिळावी, म्हणून तब्बल २३ लाख ४१ हजार २०५ रुपये भरले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले़ तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी