बनावट ई मेलद्वारे २७ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:32+5:302021-02-05T05:14:32+5:30
पुणे : कंपनीच्या ईमेल आयडीशी साधम्य दर्शविणारा ई-मेल बँकेला पाठवून सायबर चोरट्यांनी एक कंपनीला तब्बल २७ लाख ७९ हजार ...

बनावट ई मेलद्वारे २७ लाखांची फसवणूक
पुणे : कंपनीच्या ईमेल आयडीशी साधम्य दर्शविणारा ई-मेल बँकेला पाठवून सायबर चोरट्यांनी एक कंपनीला तब्बल २७ लाख ७९ हजार ७२१ रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी मुख्य लेखापाल सदाशिव पाटील यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पाटील हे संत ज्ञानेश्वर स्टील या मुळा रोडवरील कंपनीत मुख्य लेखापाल आहेत. चोरट्याने कंपनीच्या ई मेल आयडीशी साधम्य असणारा बनावट ई मेल आयडीवरुन एका बँकेला १ डिसेंबरला १५ लाख ५० हजार व ३ डिसेंबरला १२ लाख २९ हजार रुपये ट्रान्सफर करण्यासाठी बँक खात्यावर मेल पाठविला. बँकेने कंपनीनेच ई मेल पाठविला असे समजून हे पैसे ट्रान्सफर केले. कंपनीच्या वतीने फसवणुकीची फिर्याद देण्यात आली आहे.
शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करत असून आमच्याकडे पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देऊ, असे आम्ही दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ओंकार सुतार (वय ३४, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी राघव चिंतावर (रा. शिवणे, मुळ हैदराबाद) आणि नरेश बाबु (रा. नांदेड सिटी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुतार व राघव हे ओळखीचे आहेत. राघव याने त्याचा मित्र नरेश हा शेअर मार्केटचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देईल, असे आमिष दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सुतार यांनी त्यांच्याकडे १५ लाख रुपये गुंतविले होते. परंतु त्यांनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली.