शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई: रिपोर्ट्स
3
"बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
4
"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई
5
अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..."
6
पवन कल्याण यांच्या पत्नीनं तिरुमाला मंदिरात संपूर्ण केस दान केले; काय आहे कारण?
7
मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 
8
अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
9
Astro Tips: इच्छापूर्ती वा आर्थिक अडचणीतून सुटकेसाठी चार सोमवार करा 'हे' सोपे उपाय!
10
लहान मुलावर लाईट कोसळली अन्...; 'गुड बॅड अग्ली' सिनेमाच्या शोदरम्यान घडली दुर्दैवी घटना
11
बिग बींनी ट्वीट करत विचारली फॉलोवर्स वाढवायची ट्रिक, चाहत्याने सांगितला भन्नाट उपाय, म्हणाला- "रेखासोबत..."
12
'भारताच्या सर्जनशीलतेची  अवघ्या जगाला भुरळ', ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’मध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध
13
'भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला'; नव्या हल्ल्यात ३२ जण ठार
14
रणबीर कपूरने 'हायवे'च्या प्रमोशनपासून दूर ठेवलेलं? रणदीप हुडा म्हणाला, "हो, मलाही तेच वाटलं..."
15
FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट 
16
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२५: प्रवास होईल, आर्थिक लाभ होईल, अविवाहितांचे विवाह ठरतील!
17
IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?
18
केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत
19
४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...
20
Tarrif War: भारत निर्यातीत बनणार ‘दादा’, लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार

पुण्यात सारस्वत बँकेच्या चेअरमनसहित ८ जणांवर गुन्हा दाखल; अडीच कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 14:32 IST

बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन कंपनीच्या सहमतीविना परस्पर बनावट कर्ज खाते काढले

पुणे : बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन कंपनीच्या सहमतीविना परस्पर बनावट कर्ज खाते काढले. ते कंपनीचेच कर्ज खाते आहे असे भासवले. कंपनीने सुरक्षा म्हणून दिलेल्या धनादेशाद्वारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सारस्वत बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, झोनल व्यवस्थापकासह ८ जणांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम एकनाथ ठाकूर (रा. एकनाथ ठाकूर भवन, प्रभादेवी), व्यवस्थापकीय संचालक स्मिता एस संधाने, वसुली अधिकारी आनंद चाळके, झोनल व्यवस्थापक पल्लवी साळी (रा. चिंचवड), शाखा व्यवस्थापक अभिषेक भगत (रा. विश्रांतवाडी), झोनल व्यवस्थापक रत्नाकर प्रभाकर (रा. एरंडवणा) व इतर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्मिता समीर पाटील (रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ ऑगस्ट २०१८ ते १० जानेवारी २०२० दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सारस्वत बँकेच्या विश्रांतवाडी शाखेतून साडेसोळा कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील काही रक्कम कंपनीने फेडली. कर्ज थकल्याने बॅकेेने कंपनीचे आजी माजी संचालक व जामीनदार यांना २३ ऑगस्ट २०१८ रोजी १३ कोटी रुपयांचे वन टाईम सेटलमेंट प्रस्ताव दिला. कंपनीने तो मान्य करुन सुरक्षा म्हणून विना तारखेचे ६ धनादेश दिले होते. त्यातील तीन धनादेशावर एकूण अडीच कोटी रुपये एवढी रक्कम लिहून बँकेने ते पैसे कंपनीच्या खात्यातून काढून घेतले. दरम्यान, काही महिन्यांनंतर बँकेने वन टाईम सेटलमेंटचा प्रस्ताव अमान्य असल्याचे कळविले. तेव्हा कंपनीने चौकशी केल्यावर अडीच कोटी रुपये कंपनीच्या कर्ज खात्यात जमा न करता बँकेने परस्पर कंपनीच्या नावाने दुसरे बनावट खाते काढून त्यात हे धनादेश भरुन कंपनीची फसवणूक केली. फिर्यादीची कंपनी बँकेचे कर्ज रक्कम नियमित भरत असताना कर्ज रक्कम भरत नाही असे दाखवून कंपनीचे कर्ज खाती एनपीए झाल्याचे घोषित केले. फिर्यादी कंपनीच्या व आजी माजी संचालक व जामीनदार यांच्या वैयक्तिक मालकीच्या मालमत्ता जाणीवपूर्वक हडप करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक