ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:17+5:302021-02-05T05:14:17+5:30

पुणे : ससून रुग्णालयातील क्रोमा आयसीयू वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन मागवायचे असल्याचे सांगून ऑनलाईन पैसे ...

Fraud of patients in the name of doctors at Sassoon Hospital | ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांची फसवणूक

ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांची फसवणूक

पुणे : ससून रुग्णालयातील क्रोमा आयसीयू वॉर्डात उपचारासाठी दाखल

असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन मागवायचे असल्याचे

सांगून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणुकीचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. एका

नातेवाईकाची २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी ब्रजेश उमाशंकर तिवारी (वय ४६, रा. धानोरी) यांनी बंडगार्डन

पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा सत्यम तिवारी याच्यावर

क्रोमा आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. ते शनिवारी दुपारी ससून

रुग्णालयात असताना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यात बोलणाऱ्याने आपण डॉ. देशपांडे बोलत असल्याचे सांगून सत्यम याच्यासाठी एक इंजेक्शन

आवश्यक आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांचा स्टॉक नाही़ त्यामुळे हे इंजेक्शन

बाहेरुन मागवावे लागेल़ एका इंजेक्शनची किंमत ७ हजार रुपये आहे. येथे

जवळच्या मेडिकलमधून घेतल्यास ते महाग पडेल. त्यामुळे तुम्ही २२ हजार

रुपये ऑनलाईन पैसे पाठवा. मी हे इंजेक्शन माझ्या ओळखीच्या मेडिकल

स्टोअर्समधून मागवून घेतो, असे सांगितले. तिवारी यांना शंका आल्याने

त्यांनी चौकशी केल्यावर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात

आले. त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली.

मात्र, तिवारी यांच्याप्रमाणे सर्वांनाच हा प्रकार लवकर लक्षात येत

नाही. तिवारी यांच्याप्रमाणे विजय गुदले यांनाही असाच कॉल आला होता.

त्यांनी तो खरा मानून त्याने दिलेल्या नंबरवर २० हजार रुपये ऑनलाईन

ट्रान्सफर केले.

अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात

येत आहे. पोलीस उपनिरीक्षक फड अधिक तपास करीत आहेत.

यापूर्वी एका रुग्णाच्या नातेवाईकांना तातडीने पैसे पाठवा, असे सांगून ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे.

-----------

ससूनमध्ये माफत दरात होतात उपचार

ससून रुग्णालयात उपचारासाठी गरीब, दुर्बल घटकातील लोक येत असतात. ससून रुग्णालयात बहुतेक उपचार मोफत केले जातात. तसेच काही शस्त्रक्रिया, तपासण्या व उपचाराचा खर्चही अल्प असतो. मात्र, त्याची माहिती लोकांना कमी असते. त्यातूनच कोणीतरी ससून रुग्णालयात येऊन रुग्णांची माहिती घेऊन चोरटा रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Fraud of patients in the name of doctors at Sassoon Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.