शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा; बिबवेवाडी पोलिसांनी केली एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 20:08 IST

बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणार्‍यास बिबवेवाडी पोलिसांनीअटक केली आहे.

लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. गोर्‍हे बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जोरीने शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत जाहीरात केली होती. एक लाख रुपये गुंतवल्यास दिवसाला दोन ते पाच हजार रुपये नफा मिळवा, असे आमिष त्याने जाहिरातीद्वारे दाखविले होते. बिबवेवाडी भागातील एका तक्रारदाराची त्याने फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अंमलदार सतिश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन हवेली तालुक्यातील गोर्‍हे बुद्रुक येथे जाऊन सापळा लावून स्थानिकांच्या मदतीने लक्ष्मण जोरी याला पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असताना त्याने संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो लोकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचे कबूल केले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर, उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली.......... जोरी सध्या येरवडा कारागृहात असून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बिबवेवाडी पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीshare marketशेअर बाजारPoliceपोलिसArrestअटक