शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Pune: हवाई दल जवानाच्या वेशात फोटो टाकून दिशाभूल करणाऱ्या तोतयाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:49 IST

हवाई दलाच्या लढाऊ विमान तसेच मनाई असलेल्या ठिकाणांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये मिळाले

पुणे: पहलगामावरील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एअर फोर्समधील जवानाच्या वेशात लढाऊ विमानासमवेत फोटो असणाऱ्या आणि सोशल मीडियावर स्वत:ला एअर फोर्सचा जवान म्हणून मिरवणाऱ्या तोतयाला दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स, पुणे आणि खराडी पोलिसांनीअटक केली आहे. गौरवकुमार दिनेशकुमार (२५, रा. वरद विनायक अपार्टमेंट, थिटे वस्ती, खराडी, मुळ रा. अलिगड, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्या घर झडतीत एअर फोर्सचे दोन टी-शर्ट, एक आर्मी कॉम्बॅट पँट, एअर फोर्स शूज, दोन बॅजेस, एक एअर फोर्सच्या ट्रॅक सूट वरील जर्कीन असे साहित्य जप्त केले आहे. हवाई दलाचा सुट एक महिन्यापूर्वी जाळून टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. गौरव कुमार हा खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमध्ये कामाला आहे.याबाबत पोलिस हवालदार रामदास भोनाजी पालवे यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये काम करणारा एक इसम एअर फोर्सचा ड्रेस घालून वावरत असल्याची माहिती मिळाली. तसेच, सोशल मीडियावर तो नागरिकांना आपली खोटी ओळख सांगून त्यांची दिशाभूल करत असल्याची माहिती दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली. त्यांनी याबाबत खराडी पोलिसांना कळवताच, पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी या तोतयाच्या घरात एअर फोर्सशी संबंधित साहित्य मिळाले.

त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये विविध लढाऊ विमानांसोबतचे फोटो, एअर फोर्सचा परमेश्वरन हॉल व इतर ठिकाणी काढलेले फोटो मिळून आले आहेत. गौरव कुमार हा गेल्या एक वर्षापासून पुण्यात एकटा राहत असल्याची माहिती समोर आली आहे. २०२० मधील एक ओळखपत्रही त्याच्याकडे मिळून आले आहे. त्याने हा सर्व प्रकार का केला, याचा यामागे काय हेतू होता, याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीairforceहवाईदलfraudधोकेबाजीArrestअटक