शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौरांसह अनेकांना गंडा घालणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:17 IST

जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे़. 

ठळक मुद्देयाप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यास डेक्कन पोलिसांनीअटक केली आहे़. आशिष काळुराम गोयरे (वय४१, रा़ शंकर महाराज मठाजवळ, हडपसर) असे त्याचे नाव आहे़. आशिष याच्यावर समर्थ, शिवाजीनगर, अलंकार, डेक्कन अशा अनेक पोलीस ठाण्यात यापूर्वी फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत़. डेक्कन पोलिसांनी त्याला अशाच एका प्रकरणात २००७ मध्ये अटक केली होती़. तो अनेक वर्षे फरार होता़. याप्रकरणात इंद्रनिल गजमुले यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. यांची हिंजवडी येथे २० गुंठे जमीन आहे़. .या जमिनीची आशिष याने २०१७ मध्ये बनावट विसार पावती बनविली व त्याआधारे ती जागा लता केरकर, समीर केरकर, केतन केरकर यांना विकण्याचा घाट घातला़. त्यासाठी त्यांना वृत्तपत्रात जाहिरात देण्यास लावली होती़. ही जाहिरात फिर्यादी इंद्रनिल यांच्या पाहण्यात आली़ त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली होती़. त्यानंतर पोलीस आशिषचा शोध घेत होते़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आशिष हा बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा विकण्याची असल्याचे दाखवून इसार रक्कम घेऊन फसवणूक करीत असे़ माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांना नवी पेठेतील जागा विकायची असल्याचे सांगून २०१४ मध्ये त्यांना कागदपत्रे दाखविली व त्यांच्याकडून इसार रक्कम घेतली होती़. त्यानंतर त्यांना जागा न विकता त्यांची फसवणूक केली होती़. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़. याच प्रकारे त्याने अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ८५ लाख रुपये, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे़. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक