शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनास चारपट मोबदला; पुरंदर विमानतळाबाबत जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

By नितीन चौधरी | Updated: April 5, 2025 16:15 IST

- ‘चुकीचे गट क्रमांक टाकून एजंटांकडून शेतकऱ्यांच्या जमिनींची विक्री होत आहे.

पुणे :पुरंदरविमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकरी; तसेच मालकांना गेल्या तीन वर्षांतील रेडिरेकनर दरांच्या सरासरीपैकी सर्वाधिक दराच्या चौपट दर दिला जाईल. तसेच आणखी वाढीव मोबदलाही देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे; मात्र जमीन देण्यास विरोध केल्यास सक्तीने भूसंपादन करताना केवळ चारपटच मोबादला मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले.विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरंदरविमानतळासाठी भूसंपादन करण्यापूर्वी सात गावांतील शेतकरी, जमीनमालकांशी चर्चा करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे, पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी गुरुवारी एखतपूर, मुंजवडी या दोन गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारची भूमिका समजावून सांगितली. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील उपस्थित होते.

यावेळी जमीन संपादित होणार असल्याने अनेकांनी ती देण्यास विरोध दर्शविला. तर बागायती जमीन संपादित होत आहे. त्यामुळे आम्ही भूमिहीन होणार आहोत. आमचे पुनर्वसन तालुक्यातच करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मुंजवडीचे उपसरपंच तुषार झुरंगे यांनी ‘चुकीचे गट क्रमांक टाकून एजंटांकडून शेतकऱ्यांच्या जमिनींची विक्री होत आहे. जमीन विक्रीचे प्रमाण वाढले असून त्यानुसार होणाऱ्या नोंदीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.लांडगे यांनी विमानतळ प्रकल्प, भूसंपादन प्रक्रिया, जमिनीची दरनिश्चितीची कार्यपद्धती समजावून सांगितली. जमिनीची किंमत, जमिनीचा मिळणारा मोबादला याकडे पांढरे यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. ‘स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना गेल्या तीन वर्षांतील बाजारमूल्यासह बाजारभावाच्या सरासरीपैकी सर्वोत्तम दराच्या चारपट रक्कम मोबादला देण्यात येईल. तसेच अतिरिक्त रक्कम देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले जातील. जमीन देण्यास विरोध करणाऱ्यांकडून सक्तीने भूसंपादन केले जाईल. केवळच चारपटच त्यांना मोबादला देण्याचे सरकारचे धोरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करण्यात येईल. भूसंपादन कायद्यानुसार जमिनीच्या किमतीच्या चारपट मोबादला देण्यात येईल. स्थानिक शेतकरी, जमीनमालकांनी विमानतळासाठी जमीन देण्यास सहकार्य करावे.-डॉ. कल्याण पांढरे, जिल्हा भूसंपादन समन्वयक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरAirportविमानतळ